Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'बालसाहित्य वाचण्याच माझं वय राहिलं नाही';संजय राऊतांच्या पुस्तकाची देवेंद्र फडणवीसांनी इज्जतच काढली

Devendra fadanvis on sanjay raut book narkatla swarg : शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे उद्या अर्थात शनिवारी दि.17 मे रोजी अनावरण होत आहे.

दरम्यान, या पुस्तकातील काही प्रकरणाची माहिती काही माध्यमांच्या हाती लागली. त्यामुळे या पुस्तकावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. या पुस्तकातून राऊत यांनी अनेक खळबळजनक दावे केले.

दरम्यान, भाजप नेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांच्या पुस्तकाची विदर्भीय स्टाईलने खिल्ली उडवली आहे. बालसाहित्य वाचण्याचे माझे वय राहिलेले नाही आणि मला आता वेळ देखील नाही, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांना जोरदार टोला हाणला. तर संजय राऊत काही खूप मोठे नेते नाहीत, त्यांच सोडून द्या, असेही फडणवीस म्हणाले.

devendra fadanvis on sanjay raut

संजय राऊत यांच्या पुस्तकात काय?

दिल्लीत भाजपचे जेष्ठ नेते मला सांगायला आले होते, महाविकास आघाडी सरकार आम्ही पाडणार आहोत. दिल्लीत आमचा निर्णय झाला आहे आणि मला शांत राहायला सांगितलं. नाहीतर तुम्ही तुरुंगात जाल, असं मला सांगितलं. त्यानंतर मी हे सगळं व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून कळवलं होतं, असे संजय राऊत यांनी पुस्तकात म्हटलं आहे.

मोदींच्या अटकेला शरद पवारांचा विरोध

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात यूपीएचे सरकार होतं. मोदी विरुद्ध केंद्र असा वाद सुरू होता. गोधराकांडात सीबीआय अनेक चौकशींचा ससेमीरा लागला होता. या दरम्यान गुजरातचे अनेक पोलीस अधिकारी आणि माजी गृह राज्यमंत्री अमित शाह यांना तुरुंगात जावे लागले होते. चौकशी आणि कारवाईची बंदूक मुख्यमंत्री मोदींपर्यंत वळली.

नरेंद्र मोदी यांना अटक होईल असे वातावरण तेव्हा निर्माण झाले होते. यावेळी त्यांची राजकीय मतभेद असतील पण लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकणं योग्य नाही असे परखड मत शरद पवारांनी एका कॅबिनेटमध्ये व्यक्त केले होते.

शरद पवारांच्या या भूमिकेला अनेकांनी मूक संमती दिली होती आणि त्यामुळे मोदींची अटक टळली. मोदींनी या उपकाराचे स्मरण पुढे किती ठेवले ? असा सवाल या पुस्तकात राऊत यांच्याकडून विचारण्यात आलेला आहे.

अमित शहांसाठी शरद पवारांनी शब्द टाकला

संजय राऊत यांच्या पुस्तकात अमित शहांविषयी देखील लिहण्यात आले आहे. अमित शहा यांना शरद पवार व बाळासाहेब ठाकरे यांनी कशी मदत केली, याची माहिती देण्यात आली आहे. पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, अमित शहा हे एका खून प्रकरणात आरोपी होते, त्यानंतर तडीपारही केले. याप्रकरणी त्यांना जामीन देण्यास सीबीआयच्या विशेष पथकाचा विरोध होता. त्या पथकात एक महाराष्ट्र केडरचे अधिकारी होते, त्यांचा तर शहांना जामीन देण्यास पराकोटीचा विरोध होता. या सगळ्यांमध्ये त्यावेळी मोदींनी पवारांना विनंती केली आणि पवारांनी त्यांच्या स्वभावानुसार मदत केली. शहा यांना एका प्रकरणात जामीन मिळाला. मात्र, मग अमित शाह पुढे महाराष्ट्राशी कसे वागले? असा प्रश्न या पुस्तकातून विचारण्यात आला आहे.

'नरकातला राऊत' असं पुस्तकाचं नाव करावं

संजय राऊतांच्या 'त्या' पुस्तकाच नाव बद्दलण्याची गरज आहे. नरकातला राऊत असं पुस्तकाचं नाव ठेवावं, संजय राऊत यांना यासाठी पत्रही पाठवणार असल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच, या पुस्तकात स्वत:च राजकीय अधिपतन कसं असतं याचा लेखाजोखा मांडला, नैतिक दिवाळखोरीची कहाणी लिहिली आहे.

भाजप सेना युती सर्वोत्तम होती, या युतीला बाळासाहेब ठाकरे यांनी न्याय देण्याचा काम केले. संजय राऊत सारख्या व्यक्तीनेच शिवसेना संपवली, हिंदुत्व विचारांशी फारकत घेऊन काँग्रेसचा दावणीला उद्धव ठाकरे यांना बांधण्याच काम केले, असे भाजप नेते तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+