महाराष्ट्र पुढील 50 वर्षे पहिल्या क्रमांकावर राहिल: देवेंद्र फडणवीस
पालघर- आजचा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिण्याचा दिवस आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी बनली ती केवळ जेएनपीटी बंदर आणि परिसरामुळे पण आता जेएनपीटी पेक्षा तिप्पट मोठी वाढवण बंदर तयार होत आहे, त्यामुळेे पुढील पन्नास वर्षे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहील. असे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराचे भूमिपूजन होत आहे. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
या बंदरासाठी तीस वर्षांचा संर्घष करावा लागला पण, पंतप्रधान मोदींचे 2014 मध्ये सरकार आले आणि हे जन्माला येण्याआधीच मृत झालेले बंदर आता पुन्हा जिंवत होत आहे. मोदींनी याला राष्ट्रीय बंदराचा दर्जा दिला आहे. वाढवण बंदरामुळे पंतप्रधान मोदींचे नाव इतिहासात लिहिले जाईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पालघरमध्ये तिसरे विमानतळ व्हावे
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईची वाढ दिवसेंदिवस होत आहे ही वाढ आता वसई विरार पालघर कडे वाढत आहे
त्यामुळे भविष्यात इथे मुंबईचे तिसरे विमानतळ झाले तर या परिसराच्या विकासाला आणखी गती येईल.
स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देणार
वाढवण बंदरामुळे येथील पर्यावरणाला धोका पोहचणार नाही, इथे एक लाख नोक-या उपलब्ध होतील, स्थानिक मच्छिमार बांधव, आदिवासी बांधवांना प्रशिक्षण देऊन त्यांना या बंदरात नोक-या दिल्या जातील, स्थानिक समुदायांत हस्तक्षेप केला जाणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications