अजित पवारांनी राजकोट किल्ल्यावर केली पाहणी; म्हणाले- तो पळून-पळून......
सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट आहे. पुतळा कोसळ्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी महायुती सरकारवर ताशेरे ओढले आहेत. सत्तेत सहभागी असणाऱ्या राष्ट्रवादीने (अजित पवार गट) आंदोलनही करण्यात आले केले. दरम्यान आज ( शुक्रवार) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन दुर्घटना घटनास्थळाची पाहणी केली, एवढेच नाही तर सरकारचे कानही टोचले
दोषींवर कडक कारवाई होणार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, याप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, शिवरायांचा पुन्हा भव्य दिव्य पुतळा उभारला जाईल, असंही त्यांनी सांगितले. यावेळी सुनील तटकरे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते.' पुतळा नौदलाने बांधला की सार्वजनिक बांधकाम विभाने केला, असला वाद घालण्यात काहीच अर्थ नाही,'असंही अजित पवार म्हणाले.

तो पळून पळून जाणार कुठे?
याप्रकरणातील बांधकाम सल्लागार असलेला आरोपी चेतन पाटीलला पोलिसांनी कोल्हापूरमधून अटक केली आहे. मात्र पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे हा अद्याप आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. यावर अजित म्हणाले 'तो पळून पळून जाणार कुठे, तो देश सोडून तर जाऊ शकत नाही. त्याला लवकरच शोधलं जाईल. पुतळा उभारतानाा नेमकी काय चूक झाली, हे त्याच्याकडून जाणून घेतले जाईल'.
शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध नेत्यांनी राजकोट किल्ल्यावर येऊन भेट देखील देऊन गेले आहेत. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या किल्ल्यावर येऊन दुर्घटना स्थळाची पाहणी केली. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्यांच्यासोबत यावेळी होती.
अजित पवारांनी मागितली होती माफी
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर विरोधकांनी सरकारवर ताशेर ओढले होते. त्यानंतर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हटले होते की, शिवरायांचा पुतळा कोसळला ही गंभीर बाब आहे. राज्यातील 13 कोटी जनतेची मी जाहीर माफी मागतो. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार वैभव नाईक यांनी खरे शिवप्रेमी असाल तर सत्तेवर लाथ मारुन बाहेर पडा असे आव्हान अजित पवारांना दिले.












Click it and Unblock the Notifications