वेषांतराचा आरोप खरा ठरला तर राजकारण सोडून देईल- अजित पवार
नाशिक : मला लपून छपून राजकारण करण्याची सवय नाही. मला कुठे जायचे असेल उघडपणे जाईल.मला घाबरण्याची गरज नाही. वेषांतराचा आरोप खरे ठरला तर राजकारण सोडून देईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक दौ-यावर आहेत. त्यावेळी पवारांनी माध्यमांशी संवाद सांधला.
आमच्या चांगल्या योजना येत असल्याने विरोधक घाबरले आहेत.त्यामुळे त्यांनी असे उद्योग चालवले आहे. मी 35 वर्षं राजकीय जीवनात कार्यरत आहे.खासदार,आमदार,राज्यमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री अशी अनेक पदं मी सांभाळली आहेत. एक जबाबदारी मलाही कळते.एखाद्यानं नाव बदलून जाणं हा गुन्हा आहे. सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. खुशाल काहीही बोललं जातंय.कोण बहुरुपी म्हणतंय, कोण काय म्हणतंय.. म्हणणाऱ्यांना लाज, लज्जा, शरम वाटली पाहिजे.

माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. माझी बदनामी करण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. राज्यात वाचाळवीरांची संख्याही वाढली आहे. सकाळचा जो भोंगा असतो त्याच्याकडून उचलली जीभ लावली टाळ्याला, असा प्रकार होत असतो, अशी टीका संजय राऊत यांचे नाव न घेता अजित पवार यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण
भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठी दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत बैठका झाल्या होत्या. त्या बैठकींना जाण्यासाठी मास्क आणि टोपी घालून विमानाने जात होतो. विमान प्रवासासाठी स्वतःचे नाव देखील बदलले होत्या अशा बातम्या समोर आल्या होत्या.
दरम्यान वेशांतरच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे अजित पवार चांगलेच अडचणीत आले होते. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपण वेषांतर करुन दिल्लीला गेल्याच्या बातम्या खोट्या आहेत. ते सिद्ध झाले तर राजकारण सोडू, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications