Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शाहू-फुले-आंबेडकर अन् शिवरायांचा महाराष्ट्र मोदी-शहा-अदानींचा होऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

शिवसेनेचा दसरा मेळावा हा राज्यातला महत्त्वाचा विषय व चर्चेचा विषय आहे. दर वर्षी दसऱ्याच्या या मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल होत असतात. मात्र आता शिवसेनेचे दोन मेळावे होत आहेत. एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा तर दूसरा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा हा आझाद मैदानावर होणार आहे. तसेच उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवतीर्थावर पार पडला.

Uddhav Thackeray VS Eknath Shinde

विशेष बाब म्हणजे यंदा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची कधीही घोषणा होऊ शकते. परंतु, पण सर्वच राजकीय पक्ष 'इलेक्शन मोड'मध्ये गेल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. तर एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल चढवला.

8:46 PM, 12 Oct

तर आनंद दिघेंनी एकनाथ शिंदेंना गोळी घातली असती- उद्धव ठाकरे

आनंद दिघेंनी अक्षय शिंदेला गोळी घातलीच असती. पण संस्थाचालकांना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंना देखील गोळी घातली असती, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शेवटच्या श्वासापर्यंत हा महाराष्ट्र मोदी शहांचा होऊ देणार नाही. हा महाराष्ट्र फुले-शाहू- आंबेडकरांचाच आहे, अन् शेवटपर्यंत राहणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
8:43 PM, 12 Oct

भाजपला गुलाबी अळी अन् दाढीवाला खोडकिडा लागला - उद्धव ठाकरे

कापसाच्या खोडाला खोडकिडा लागतो. तर बोंडावर गुलाबी अळी पडते. तिला गुलाबी अळी म्हणतात. आता भाजपच्या झाडाला दाढीवाला खोडकिडा लागला असून, बोंडालाही गुलाबी अळी लागली आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी एकनाथ शिंदे व अजित पवारांवर निशाणा साधला. मी काही दिवसांपूर्वी नागपूरच्या दौऱ्यावर गेलो होतो. तिथे शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती माझ्या कानावर आली. त्यांना बँका कर्ज देत नाहीत. निसर्ग साथ देत नाही. लोकशाही वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील लोकांनी एकत्र आले पाहिजे. न्यायालयाचे दारं ठोठून आमचे हात दुखायला लागले. आता जनतेच्या मंदिरात आम्हाला जावे लागत आहे, तीच जनता आम्हाला न्याय देईल, अशी अपेक्षा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
8:40 PM, 12 Oct

..तर मोदीजी तुम्ही सरकारमध्ये बसले नसते - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठा, धनगरांना आरक्षण नाही. ओबीसी, आदिवासी भयभीत झाले आहेत. तुम्ही असं का करताय ?, मराठी माणसाने हिंदू म्हणून त्यांची ताकद दाखवली नसती तर मोदीजी तुम्ही दिल्लीत बसला नसतात. माणसाने किती निर्लज्ज असावं ? अमित शहा म्हणतात 2029 ला भाजपचं सरकार येईल. मी शहरी बाबू आहे, मला शेतीतलं कळत नाही. पण शेतकऱ्याचे अश्रू मला दिसतात जे तुम्हाला दिसत नाहीत, असे म्हणत ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. धारावीच्या माध्यमातून अख्खी मुंबई लुटतायत. अदानीला सगळं देऊन टाकलंय. आम्ही रक्त सांडून मुंबई मिळवली. मुंबई अदानीकडून विकत घेतली नाही, अदानीच्या गळ्यात महाराष्ट्रात बांधला जातोय, पण ते आम्ही होऊ देणार नाही, आमचं सरकार आल्यावर सर्वात आदी धारावी अदानीमुक्त करू, अशी ग्वाही ठाकरेंनी दिली.
8:35 PM, 12 Oct

प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचे मंदिर बांधणार -ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी यावेळी महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधण्याचीही घोषणा केली. ते म्हणाले, आज काही लोक आपल्यावर चाल करून येत आहेत. आपण त्यांचा राजकीय शिरच्छेद करू. श्रीरामाने रावणाचा वध केला म्हणून आपण आज दसरा साजरा करतो. प्रभू श्रीरामांसोबत वानरसेना होती. ते आमचे दैवत आहेत. त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजही आमचे दैवत आहेत. ते मते मिळवण्याची मशिन नाहीत. भाजपने मतांसाठी महाराजांचा पुतळा उभारला. पण त्यातही त्यांनी पैसे खाल्ले. महाराष्ट्रात आमचे सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचे मंदिर बांधले जाईल. पंतप्रधान मोदींना शिवाजी महाराज हे मते मिळवण्याचे यंत्र वाटतात. त्यांनी त्याचा वापर ईव्हीएमसारखा करू नये. जो महाराजांच्या मंदिराला विरोध करेन त्यांना महाराष्ट्र बघून घेईन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
8:21 PM, 12 Oct

संघाला आत्ताचे भाजप मान्य आहे का, ते सर्व संकरीत झालेले- उद्धव ठाकरे

शिवाजी महाराज हे काही ईव्हीएम नाही. ईव्हीएम सारखा त्याचा वापर करू नका, याद राखा. आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मला संघाबद्दल आदर आहे. मोहन भागवत जे काही गोष्टी सांगतात, ते नेमकं कोणासाठी सांगत आहात. दहा वर्षांपासून मोदींचा सरकार अन् तरी स्वसंरक्षण करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन का करत आहात. तिसऱ्यांदा सरकार येऊन देखील तुम्ही म्हणता हिंदू खतरे में है, व्हा, हा विचार मला काही पटत नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हणत संघप्रमुखावर निशाणा साधला.
8:17 PM, 12 Oct

मला दिल्लीश्वरांची परवा नाही - उद्धव ठाकरे

मला दिल्लीश्वरांची परवा नाही - उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच राज्यातील महायुती सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, आजची लढाई सोपी नाही. एकीकडे अब्दाली सारखी माणसे आहेत. पण त्यांना कल्पना नाही की ही ठाकरेंची शिवसेना आहे. जनता ही आमची वाघनखे आहेत. माझ्याकडून सर्वकाही ओरबाडून घेतले. पण त्यानंतरही जनता माझ्या सोबत राहिली. त्यामुळे मला दिल्लीश्वरांची परवा नाही. त्यांच्या छातीत भगवा गाडून मी आजही इथे उभा आहे. आता येथील शिवसैनिक मशाल बनून सरकारला चूड लावल्याशिवाय राहणार नाही.
8:12 PM, 12 Oct

ही तर शेठजीची सर्व श्वान- उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

गोमुत्रधारी हिंदूत्व आम्हाला मान्य नाही. म्हणून त्यांच्याविरोधात गेला आहे. हिंदूत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, अदानी आमची शान अन् शेठजींचे आम्ही श्वान ही त्यांचीे ओळ राहिले आहे, हे सर्व लांडगे वाघाचे कातडे पांघरण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे म्हणत ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ठाकरे यांनी बोलताना म्हणाले की, जशी माझी निवड जेआरडी टाटांनी केली तशी तुझी निवड बाळासाहेब ठाकरेंनी केली . बाळासाहेबांचा वारसा तुला लाभला आहे. रतन टाटा उद्धव ठाकरेंना म्हणाले
8:07 PM, 12 Oct

हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रात निकाल लागतील - एकनाथ शिंदे

हरियाणाप्रमाणे राज्यात देखील महायुती सरकार निवडून येईल, फेक नरेटिव्ह करणाऱ्यांना लोक आता थारा देणार नाही. लोकसभेत त्यांनी तात्पुरते यश मिळवले, पण आता जनता त्यांना उभी करणार नाही. लाडकी बहीण देखील यांना जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
8:04 PM, 12 Oct

फेसबूक लाईव्ह केल्याशिवाय यांनी काय केले- शिंदेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह व्यतिरिक्त काय केले, ते त्यांनी सांगाावे. रुग्णांच्या तोंडची खिचडी खाल्ली, मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे द्या हिशोब. आम्ही महायुती सरकारम्हणून घेतलेले निर्णय अन् महाविकास आघाडी सरकार म्हणून काय कामं केले, याची तुलना नक्की करा. मग त्यांना त्यांची जागा दिसेल, असे म्हणत शिंदे यांनी ठाकरे्ंवर निशाणा साधला.
8:01 PM, 12 Oct

शिंदे म्हणाले- उठाव केला नसता तर...!

एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळसाहेबांनी सांगितले होते अन्याय सहन करू नका आणि जेव्हा अन्याय सहन होत नव्हता तेव्हा आम्ही उठाव केला. हा उठाव केला नसता तर शिवसेनेचे आणि शिवसैनिकांचा अपमान होत राहिला असता. आपले सरकार सत्तेवर आल्यावर महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 वर आणण्याचे काम आम्ही केले, याचा आम्हाला अभिमान आहे. एकनाथ शिंदे दररोज निर्णय घेतो म्हणून काही लोकांच्या पोटात दुखते, असे म्हणत जोरदार निशाणा साधला.
7:51 PM, 12 Oct

काहींना हिंदू म्हणायची देखील लाज वाटते - एकनाथ शिंदे

काहींना हिंदू म्हणायची देखील लाज वाटते - एकनाथ शिंदे
'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधावांनो भगिनींनो आणि मतांनो', या वाक्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरुवात. काही लोकांना हिंदू या शब्दाची अलर्जी झाली आहे, काही लोकांना हिंदूहृदयसम्राट म्हणायची लाज वाटत आहे. असा थेट हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच केला आहे.
7:48 PM, 12 Oct

ठाकरेंकडून फक्त शिवीगाळ - शंभूराज देसाई

शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई म्हणाले की, दादरच्या मेळाव्यातून टीका शिवीगाळच ऐकायला मिळेल, त्यांच्याकडून दुसरी काही अपेक्षा नाही. हिंदुत्वाचे ज्वलंत विचार आम्ही पुढे नेत आहोत. मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलेले आहे. जरांगे पाटलांच्या मागणीनुसार सकारात्मक चर्चा सुरू आहे.
7:47 PM, 12 Oct

गुजरातला खिरापत वाटण्याचे काम सुरू - उद्धव ठाकरे

आदित्य ठाकरे म्हणाले की, ही लढाई महत्त्वाची आहे. ही लढाई वैयक्तिक नाही, तर महाराष्ट्राची लूट थांबवण्यासाठी आहे. मुंबईला अदाणीच्या घशात घालू द्यायचे का? याचा निर्णय जनतेला घ्यायचा आहे. हे सरकार विविध प्रकल्पांची खिरापत आपल्या उद्योगपती मित्रांना देत आहे. ते थांबवण्यासाठी आपल्याचा एकजूट दाखवायची आहे.
7:45 PM, 12 Oct

अदानींच्या घशात सर्व घालण्याचे काम - आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे म्हणाले, विधानसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. या लढाईची आपण गत 2 वर्षांपासून वाट पाहत आहोत. राज्याची निवडणूक लवकरच जाहीर होईल. पण उद्योगपती गौतम अदाणी यांची सर्व काम होत नाहीत, तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही, असे मला एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यामुळे याविषयी साशंकता आहे.
7:44 PM, 12 Oct

आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच केले भाषण

आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच केले भाषण
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही यावेळी महायुती सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, मी आज पहिल्यांदाच दसरा मेळाव्याला संबोधित करत आहे. माझ्या याविषयी मनात अनेक आठवणी आहेत. लहाणपणी वर्षांतला मोठा दिवस म्हणजे दसरा होता. लहानपणी मी बाळासाहेबांचे भाषण ऐकण्याचे काम केले. बाळासाहेबांनी याच मैदानात माझ्या हातात तलवार दिली होती. अनेक भाषणे पाहिली, पण 14 वर्षांत एकदाही भाषण केले नाही.
7:33 PM, 12 Oct

मिंधे सरकार म्हणजे घोटाळेबाज - आदित्य ठाकरे

मिंधे सरकार म्हणजे घोटाळेबाज - आदित्य ठाकरे
मिंधे सरकार हे घोटाळेबाज सरकार आहे. घोटाळ्यांची फाईल माझ्याकडे तयार आहे. आमचे सरकार आल्यानंतर तुम्हाला जेलची हवा घ्यावीच लागणार आहे. गुजरातला येथील हक्काचे लुबाडून दिले जात आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आम्ही गेलो, तिथे लोक घोटाळा केल्याचा आरोप करत आहे. शिवरायांच्या पुतळ्यात देखील पैसा खाणारे हे सरकार आहे. एक चष्मा खाली खालून पुतळा पडला त्यातून काहीतरी चांगलं होईल, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह दीपक केसरकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला,
7:08 PM, 12 Oct

सरसंघचालकांनी फडणवीसांना सल्ला द्यावा- अंधारे

फडणवीस यांनी या राज्यात माणसांत माणूस ठेवला नाही, जातीत जात ठेवली नाही. त्यांनी राज्यात द्वेषाचे राजकारण पसरवले. यासाठी त्यांनी कोकणातील बाजारातून रद्दबातल झालेली चिल्लर पाळली. त्यांनी ही चारआणे बारआण्याची चिल्लर बाजारात आणली. त्यामुळे सरसंघचालकांनी देवेंद्र फडणवीस यांचे कान टोचून त्यांना आम्हाला हा महाराष्ट्र शांत हवा असल्याचे सांगा, असे अंधारे म्हणाल्या.
7:07 PM, 12 Oct

फडणवीसांना द्वेषाचे राजकारण केले- अंधारेंचा निशाणा

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, राज्यात सकाळी आरएसएसचा महत्त्वाचा मेळावा झाला. त्यात सरसंघचालकांनी द्वेष संपवण्याची भाषा केली. त्यांनी देश बलशाली करण्यावर भर दिला. दुर्बल घटकांना सोबत घेण्याची सूचना केली. पण त्यांना खरेच द्वेषबुद्धी संपवण्याचा सल्ला द्यायचा असेल तर त्यांनी तो सर्वप्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावा.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+