दादरच्या कबुतरखान्याजवळ राडा! ताडपत्री फाडली,जैन समाज आक्रमक, वादावर अजित पवार काय म्हणाले? वाचा
Dadar's Kabutarkhana dispute : दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवण्यासाठी जैन समाजाच्या सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान आज ६ ऑगस्ट २०२५ रोजी राडा झाला. अनेक महिलांनी कबुतरखान्यात घुसून ताडपत्री काढली तसेच बांबूसुद्धा हटवले. मुंबई उच्च न्यायालयाने कबुदरखाना बंद करण्यासंदर्भात दिलेल्या आदेशानंतर मुंबई मनपाने कारवाई केली होती. यावर जैन समाजाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
दादर येथील कबुतरखान्यावर आज सकाळी दहाच्या सुमारास मोठ्या संख्येने आंदोलक जमले. त्यांनी कबुतरखान्यावर टाकलेली ताडपत्री फाडली. यानंतर काही आंदोलक आत शिरले व त्यांनी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. दरम्यान पोलिसांकडूनही या आंदोलकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र आंदोलक अधिकच आक्रमक झाले आणि त्यांना आत शिरुन राडा केला.

कबुतरांचे खाद्य पसरवले
दादर येथील कबुतरखान्यात आंदोलक घुसल्यानंतर त्यांनी सोबत आणलेले कबुतरांसाठीचे खाद्य तेथेच पसरवून टाकले.यानंतर कबुतरखान्यावर झाकलेली ताडपत्री आंदोलकांनी काढली, याठिकाणचे लाकडी बांबूही तोडण्याचा आंदोलकांकडून प्रयत्न झाला. दरम्यान आता त्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
काय म्हणाले अजित पवार?
दादर येथील कबुतरखान्याची संदर्भात अजित पवार म्हणाले, हा पशुपक्ष्यांच्या संदर्भातील प्रश्न आहे यात राजकारण आणू नये तसे काही कारणही नाही. पक्ष्यांवर प्रेम दाखवले ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे. त्यातून काही आजार होऊ नये हे महत्वाचे आहे. खरंच कबुतरामुळे मानवाला आजार होतात का यावर संशोधन करा. कबुतर काही आज या ठिकाणी आलेले नाहीत, पुर्वीपासून मुंबईत कबुतर आहेत ही वस्तूस्थिती आहे.
कबुतरांना खायला देण्यासंदर्भात काय आहे धारणा
कबुतरांना खायला देणं हे एक पवित्र धर्मकार्य आहे त्यामुळे पूर्वजांच्या आशीर्वाद मिळतो अशी जैन धर्मामध्ये धारणा आहे. येथे हा विषय भूतदया आणि प्राणिमात्रांविषयीच्या करुणेशी संबंधित आहे. अमावस्येच्या दिवशी या कार्याला विशेष महत्त्व दिले जाते, जैनच नव्हे तर इतर काही संस्कृतीमध्येसुद्धा कबूतर म्हणजे पृथ्वी आणि अध्यात्मिक विश्वातील संदेश वाहक असून त्यांना खाऊ घातल्याने अध्यात्मक ऊर्जेचे अनुभूती मिळते आणि आपण परमार्थ मला जोडले जातो अशी धारणा आहे.












Click it and Unblock the Notifications