Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दादरच्या कबुतरखान्याचा नेमका वाद काय; जैन मुनींनी दंड का थोपटले?, सेना-भाजप आक्रमक का?

dadar kabootarkhana controversy : मुंबईतील दादरच्या प्रसिद्ध कबुतरखान्यावरुन सध्या नवा वाद पेटला आहे. या कबुतरखान्याला विरोध करणाऱ्यांवर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी थेट आक्रमक टीका करत सरकारला आव्हान दिले आहे.

त्यांनी सत्ताधारी भाजपच्या आमदार चित्रा वाघ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांचा एकेरी उल्लेख करत, धर्माच्या विरोधात गेल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावर मनिषा कायंदे यांनी कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले असून, हा वैयक्तिक नसून मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

dadar kabootarkhana controversy

जैन मुनी म्हणाले- कोर्टालाही मानत नाहीत!

जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी कबुतरखाना बंद करण्याच्या मागणीचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अपेक्षित निर्णय न घेतल्यास कबुतरखान्यातच सामूहिक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कबुतरांना मारणे हा जैन धर्माच्या तत्त्वांविरुद्ध आहे आणि जर धर्माच्या विरोधात काही होत असेल, तर आम्ही न्यायालयाच्या आदेशालाही मानणार नाही," असे त्यांनी ठामपणे सांगितले. ते म्हणाले की, जर प्रशासन, पालिका आणि न्यायालयाने कबुतरखान्याला विरोध केला, तर देशातील सर्व जैन धर्मियांना एकत्र आणून आंदोलन केले जाईल.

मुनी निलेशचंद्र विजय यांनी चित्रा वाघ आणि मनिषा कायंदे यांच्यावरही थेट हल्लाबोल केला. चित्रा वाघ यांच्या एका विधानाचा उल्लेख करत त्यांनी, "कबुतरांमुळे माझे नातेवाईक मरण पावले असे त्या म्हणतात. पण दारू आणि कोंबड्या खाऊन किती लोक मेले, याचाही हिशेब त्यांनी द्यावा," असे म्हटले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा सन्मान करायला हवा, असेही सांगितले, परंतु संविधानातील कलम २२३ चा दाखला देत पक्ष्यांना मारणे गुन्हा असल्याचे त्यांनी सांगितले.

मनिषा कायंदे यांचे सडेतोड प्रत्युत्तर!

जैन मुनींच्या या आक्रमक भूमिकेवर आमदार मनिषा कायंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, "धर्मगुरू मार्गदर्शक असतात, पण त्यांनी आमचा एकेरी उल्लेख करणे चुकीचे आहे. आम्ही विधिमंडळाचे सदस्य आहोत." हा वाद केवळ वैयक्तिक नसून मुंबईतील दोन कोटी जनतेच्या आरोग्याशी संबंधित आहे. ज्यांना कबुतरे आवडतात त्यांनी ती घरी पाळावीत, सार्वजनिक ठिकाणी त्यांचा त्रास नको, असेही त्यांनी म्हटले.

न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करताना कायंदे यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. नागपंचमीला नागांना दूध पाजण्याची परंपरा बंद झाली, मशिदींवरील अनधिकृत भोंगे बंद होत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसारच या प्रकरणी कारवाई व्हायला हवी, असे त्यांनी म्हटले.

कबुतरखान्यावरून होणाऱ्या वादात काही लोक चाकू-सुरे काढत असल्याबद्दल त्यांनी पोलीस आणि न्यायव्यवस्थेची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.

धार्मिक भावनेवरुन संघर्ष वाढला..!

एकंदरीत, या संपूर्ण प्रकरणामुळे धार्मिक भावना आणि सार्वजनिक आरोग्य यांच्यातील संघर्ष स्पष्ट झाला आहे. हा वाद केवळ एका कबुतरखान्यापुरता मर्यादित नसून, धार्मिक श्रद्धा आणि नागरी सुविधांच्या गरजा यांच्यातील समतोलाची चर्चा पुढे आणणारा ठरला आहे. प्रशासनासाठी दोन्ही बाजूंचे समाधान करणे एक मोठे आव्हान बनले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+