Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याचा खटाटोप, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचा खटाटोप त्यांच्याच मित्रपक्षांमार्फत सुरू आहे, त्यांचा अपमान केला जात आहे. त्यांना जेवढे दुखवता येईल तेवढे जखमेवर मीठ चोळण्याचा काम केले जात आहे. असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

वडेट्टीवार यांनी नागपुरमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले की, अजित पवारांचे बॅनर फाडले जातात, बॅनरवर काळा पडदा टाकला जातो, बारामतीत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी एकदाही मुख्यमंत्र्याकडे बघितले नाही. सर्वांचे चेहरे पडले होते. हे महायुतीच्या परतीच्या प्रवासाची लक्षणे आहेत. पण जाता-जाता श्रेयवादाची लढाई रंगली आहे आणि सत्तेच्या लढाईमध्ये जो कमजोर दुवा असतो त्याला बाजूला केले जाते. तसेच प्रयत्न सध्या महायुतीमध्ये सुरू असल्याचे दिसून येते. पहिला नंबर अजित पवारांचा असेल आणि दुसरा नंबर एकनाथ शिंदेंचाही असू शकतो.

vijay wadettiwar on ajit pawar

फडणवीसांचेही पंख छाटण्याचे काम सुरु

विजय वट्टेवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाना साधला. ते म्हणाले की, फडणवीसांवर वाॅच ठेवण्यासाठी दिल्लीतून अनेक नेते पाठविले जात आहेत, त्यांचे अधिकार कमी केले जात आहे. सध्या त्यांचे पंख छाटण्याचे काम पद्धतशीरपणे हायकमांड तर्फे केले जात आहे. मोदी-शाह जोडीला माणूस उपयुक्त वाटत नसेल तर बाजूला सारण्याचे त्यांची पद्धत आहे.असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

लोकशाहीत भेदभाव करता येणार नाही

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, हिंदुत्व हा विचार आहे. त्याला धर्माशी जोडण्याचा प्रयत्न होऊ नाही. लोकशाहीमध्ये हिंदू, मुस्लिम, दलित असा भेद करता येणार नाही. शिवसेना जर मुस्लिम उमेदवार देत असेल तर त्यात काही वावगे नाही, ते लोकशाहीला मानतात, संविधानाला म्हणतात असा त्याचा अर्थ होतो.

याआधीही अजित पवारांवर साधला होता निशाणा

विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीसुद्धा अजित पवार यांच्यावर पश्चातापावरून निशाना साधला होता. लोकसभेच्या निवडणुकीनंत अजित पवारांची उपयोगिता संपल्याने भाजपला त्यांना महायुतीतून दूर सारायचे असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. तसेच अजित पवार यांच्याबरोबर राजकीय युती केल्याचे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वाहिनीवर मुलाखतीत केले होते.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेते गुलाबराव पाटील यांनी अर्थ खाते, नालायक खाते असा उल्लेख करत अजित पवारांवर टीका केली होती. तर दुसरीकडे अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात ही अजित पवार यांनी पाठ फिरवली.‌ होती. त्यामुळे अजित पवार यांची अवस्था धरले तर चावते, सोडले तर पळते अशी झाल्याची जोरदार टीका विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+