Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कॉंग्रेस नेते राहूल गांधींच्या मुंबईतील सभेला पोलिसांचा आक्षेप,जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मुंबई : काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची 20 ऑगस्टला मुंबईच्या बीकेसीमध्ये सभा होणार आहे. मात्र या सभेला मुंबई वाहतूक पोलिसांचा आक्षेप घेतला आहे. हा आक्षेप मुंबई वाहतूक पोलिसांनी एमएमआरडीएकडे पाठवला आहे. मुंबई पोलिसांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसचे नेते आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सभेला वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. सायन रेल्वे स्थानकावरील रोड ओव्हर ब्रिज बंद झाल्यामुळे संपूर्ण वाहतूक बीकेसीमधून जात आहे. बीकेसीमध्ये आधीच वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यात राहुल गांधी यांच्या सभेचा या वाहतूक कोंडीवर मोठा परिणाम होऊ शकतो असं मुंबई वाहतूक पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्यातील कॉंग्रेस नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi

बीकेसी परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. या कामामुळे पूर्वीपेक्षा रस्त्याची रंदी कमी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या सभेला किमान 20 हजार पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते.कॉंग्रेसच्या सभेच्या माध्यामातून आगामी विधानसभा निवडणूकीचे नारळ फुटणार आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी ही सभा महत्वाची असणार आहे.

दरम्यान कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या या सभेसाठी अनेक दिवसांपासून काँग्रेसकडून मोठी तयारी केली जात आहे. पण मुंबई वाहतूक पोलिसांनी या सभेवर आक्षेप घेतल्यामुळे काँग्रेस आता काय भूमिका घेणार याकड संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+