राज्यात सर्वाधिक मतं काँग्रेसची, जागावाटपाबाबत नाना पटोले स्पष्टच बोलले
महाराष्ट्रामध्ये किती प्रॉपर्टी अजून विकायचे आहेत हे पाहण्यासाठी अमित शाह, नरेंद्र मोदी महाराष्ट्रमध्ये सतत येतात. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकण्याचे काम सध्या सुरू आहे.
संविधानाला धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीही कारभार केला नाही. अमित शाह यांनी सर्व खोटे नरेटिव्ह सेट केले आणि खोट्या नरेंटिव्हचे मास्टरमाइंड अमित शाह आणि भाजपच असल्याची जोरदार टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रत्नागिरी येथे एका कार्यक्रमात केली.

अमित शाह यांच्याकडून खोटे नरेटिव्ह
संविधानाला धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीही कारभार केला नाही. अमित शाह यांनी सर्व खोटे नरेटिव्ह सेट केले आणि खोट्या नरेटिव्हचे मास्टरमाइंड अमित शाह आणि भाजपच असल्याचा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
काँग्रेसच्या बाजूला सर्वाधिक मत पण..
सोबतच सध्या राज्यात काँग्रेसच्या बाजूला जास्त मत आहेत, पण काँग्रेस कोणताही मी पणा करणार नाही. आम्ही सर्व पूर्ण ताकदीने आणि एकदिलाने महाविकास आघाडीला सोबत घेऊन पुढे जाणार आहोत. परिणामी मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडी हाच खरा चेहरा असल्याचे सुतोवाच देखील नाना पटोले यांनी केले आहे.
सर्व कंट्रोल गुजरातचा
महाराष्ट्राला विकण्याचं काम हे सरकार करत आहे. सर्व कंट्रोल गुजरातचा आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना सतत दिल्लीत जावे लागत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या होणाऱ्या दिल्ली दौऱ्याबाबत नाना पटोले यांनी ही टीका केलीय.
सोबतच महायुतीमध्ये सध्या महाभारत सुरू असून यापुढे काय काय होत ते पहा, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजप आणि महायुती सरकारने वाघनखांबाबत देखील खोटा प्रचार केलाय. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अद्यापही उभे राहिले नाही. या सर्व पिलावळला सत्तेतून बाहेर काढणं हाच आमचा उद्देश असल्याचेही नाना पटोले म्हणाले. महाविकास आघाडीचे जागावाटप ऑगस्टमध्ये होईल आणि सप्टेंबर मध्ये उमेदवार देखील जाहीर होणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटल्याचे बघायला मिळाले. परिणामी काँग्रेसच्या उच्चपदस्थ नेत्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या विषयी बोलताना नाना पटोले म्हणाले की, येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुका होतील.
त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की आम्ही काय कारवाई केली. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी केलेल्या क्रॉस वोटिंगबाबत नाना पटोले यांनी हे विधान केलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेसच्या वतीने देखील जोरदार तयारी सुरू केली असून विविध ठिकाणी कार्यकर्ता मेळावा, आढावा बैठकी घेतल्या जात आहेत. रत्नागिरी येथे काँग्रेसच्या वतीने काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले होते. या कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.












Click it and Unblock the Notifications