हा निकाल शंका घेण्यासारखाच, काँग्रेसने निकालावर दिली संपप्त प्रतिक्रिया
Congress Press Conference- पाच महिन्यांत एवढा बदल कसा घडेल. आम्ही तळागाळातील कार्यकर्ते, नेते व पत्रकारांशी संवाद साधला. कोणीही या परिणामाला मान्य केलं नाही. महाविकास आघाडी व महायुतीत टक्कर होईल, असंच प्रत्येकाचं म्हणणं होतं. आम्हाला या निकालांवर विश्वास नाही, असे रोकठोक मत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चोन्नीथला यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर काँग्रेसने आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात चोन्नीथला बोलत होते.

हे सगळं अविश्वसनिय
चोन्नीथला म्हणाले, महाराष्ट्रात असे काही जिल्हे आहेत तेथे आमचा एकही उमेदवार निवडून आला नाही. महाराष्ट्रात सहा विभाग आहेत. तेथे आमचे असे काही नेते आहेत, ज्यांचा विजय निश्चित होता. त्यांचाही पराभव झाला. हे परिणाम अविश्वसनिय आहेत. सगळे अनपेक्षित आहेत. आम्ही त्याबद्दल अधिक तपास करणार आहोत. आमचे कार्यकर्ते व नेते हैराण झाले आहेत. कुणालाच या निकालावर विश्वास नाही, असं चोन्नीथला यांनी स्पष्ट केलं.
या निवडणुकीवर शंका
चोन्नीथला म्हणाले, सलग आठ वेळा निवडून येणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला. म्हणून मला या निवडणुकीवर शंका आहे. आम्ही निकालाचा आभ्यास करु. हा निकाल महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावनेनुसार झालेला नाही, असं आमचं ठाम मत आहे. महाराष्ट्रातील जनतेवर आमचा विश्वास आहे. महाराष्ट्रातील जनता हा निकाल मान्यच करणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
आम्हाला डेटा पहावा लागेल
चोन्नीथला म्हणाले, मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सकाळी दहा वाजेपर्यंत आम्ही १५० जागांवर आघाडीवर होतो. त्यानंतर लगेच निकाल बदलला. सगळं चित्र उलटं झालं. यासाठी आम्हाला हा सगळा टेडा पहावा लागेल, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत परिणाम आणि हे परिणाम या पाच महिन्यांत एवढा बदल होऊ शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications