नुसती मुंबईच नाही, विरोधकही केले 'साफ'!, 'डिप क्लिन मुंबई'तून मुख्यमंत्री शिंदे झाले हिरो
CM Eknath Shinde's deep clean campaign for Swachh Mumbai : मुंबई ही मायानगरी, स्वप्ननगरी. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढतं, प्रदुषण, धूळ आणि कचऱ्यानं ती बकाल झाली होती. आपली मुंबई स्वच्छ व निटनेटकी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत स्वच्छतेची मोहिम हाती घेतली. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात सुरु झालेल्या या मोहिमेलाच डीप क्लिन मोहिम म्हणून ओळखले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा ड्रिम प्रोजेक्ट असून आत्तापर्यंत कित्येक मेट्रीक टन कचरा उचलून मुंबई चकाचक करण्यात आली आहे.
काय आहे नेमकी मोहीम
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुंबईतील प्रदूषण आणि हवेचा स्तर मोठ्या प्रमाणात खालावल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यानंतर मुंबई महापालिका आणि विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबईत डीप क्लिनिंग मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत पहिल्याच महिन्यात म्हणजे 1 ते 15 डिसेंबर 2023 या कालावधीत 1 हजार 200 मेट्रिक टन कचरा, डेब्रिज संकलन करण्यात आलं. या स्वच्छतेमुळे मुंबईतील प्रत्येक कानाकोपऱ्यात, लहान - मोठ्या गल्लीबोलातील कचरा, डेब्रिज उचलण्याबरोबर स्वच्छता करण्यात येत असल्यानं मुंबईकर सुद्धा सुखावले आहेत. यासाठी एकंदरीत 367 सयंत्रांचाही वापर करण्यात आला आहे.

टप्प्या टप्प्यानं होतेय मुंबईची सफाई
या मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः लक्ष घालून आहेत. मुंबई महानगरपालिका आयुक्त तसेच महापालिका अधिकारी यांना सोबत घेऊन भल्या पहाटे मुख्यमंत्री मुंबईतील रस्त्यांवर, चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवताना दिसत होते. मोहिमेसाठी विविध यंत्रणा खरेदी करण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु होण्यापूर्वी प्रत्येक शनिवारी प्रत्येक परिमंडळात एक याप्रमाणं मुंबईतील सात परिमंडळातील सात वॉर्डमध्ये ही स्वच्छता मोहीम राबवली गेली. यासाठी त्या वॉर्डातील सर्व मनुष्यबळ, यंत्रणा त्या विशिष्ट वॉर्डामध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आली. हवेतील धुळीचे साम्राज्य कमी करण्यासाठी रस्ते पाण्याने स्वच्छ धुतले गेले.
गल्लीबोळातही पोहोचले कर्मचारी
या मोहिमेत पालिकेचे कर्मचारी, अधिकारी असा सुमारे अडीच हजार कर्मचाऱ्यांचा स्टाफ कार्यरत होता. लहान-सहान रस्ते, गल्लीबोळातील गटारं, नाल्यांचे प्रवाह तसेच नाल्यांच्या आजूबाजूचा परिसर, सार्वजनिक प्रसाधनगृहे, मैदान परिसर स्वच्छ केला गेला. फक्त साफसफाईच नाही, तर अनधिकृत होर्डिंग, भिंती पत्रके, रस्त्याच्या बाजूला असलेली बेवारस वाहने सुद्धा हटवली गेली. मुंबईतील अनेक ठिकाणी भिंती स्वच्छ करून त्यावर जनजागृती पर कलात्मक संदेशही रेखाटण्यात आले. संपूर्ण मुंबई नगरी स्वच्छ करण्याचा संकल्प मुंबई महानगरपालिकेनं घेतली असून, मुख्यमंत्र्यांच्या सहभागामुळं यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश येताना दिसून आले.
मुंबईकरांचे आरोग्य सुधारले
ज्या ठाकरे गटाचे वर्षानुवर्षे मुंबईवर राज्य होते, त्या ठाकरे गटाला अशी स्वच्छता मोहिम राबवता आली नाही, असा आरोप आता होऊ लागला आहे. गेल्या 20 वर्षांत अशी मोहिम कधीही राबवली गेली नाही किंवा कोणत्याही मुख्यमंत्र्यांने मुंबईच्या स्वच्छतेकडे एवढ्या गांभीर्याने पाहिले नाही, असेही आता सांगितले जात आहे. मुंबई स्वच्छ झाल्याने मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटला आहे. मुंबईतला कोणत्याही वार्डात, कोणत्याही गल्लीबोळात सध्या स्वच्छता दिसत आहे. ही मोहिम यापुढेही कायम राहिल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
निवडणुकीत होणार फायदा
मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न आत्तापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांने हाती घेतला नव्हता. मात्र महायुती सरकार आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या आरोग्याचे महत्त्व ओळखून त्यावर कामही सुरु केले. ही बाब सामान्य मुंबईकरांना चांगलीच भावली. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या आवाहानानंतर स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये व प्रत्यक्ष नागरिकांनीही या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मुंबईची स्वच्छता करण्यास महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना हातभार लावला. या मोहिमेतून मुख्यमंत्र्यांचा दृष्टीकोन व आरोग्याच्या काळजीबाबतचा हळवा कोपरा मुंबईकरांनी अनुभवला. या मोहिमेचा शिवसेनेच्या शिंदे गटाला आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.












Click it and Unblock the Notifications