मुख्यमंत्री शिंदेंचे आणखी एक गिफ्ट! 'यांच्यासाठी' कर्जमर्यादेत 50 हजारांवरून अडीच लाखांपर्यंत वाढ
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक मोठा निर्णय घेतला आहे. हे एकप्रकारे दिव्यांग बांधवांसाठी गिफ्टच असून दिव्यांगांना कर्जाची रक्कम 50 हजारांवरुन अडीच लाख रुपयांपर्यंत करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
सह्याद्री अतिथीगृह येथे दिव्यांग कल्याण महामंडळाची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

बैठकीत महत्वाचा निर्णय
- राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदा देखील रोजगार, स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.
- दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता यासर्व सुविधा देणारे पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकांनी सुरू करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
- दिव्यांग महामंडळाला 500 कोटी रुपयांचे भागभांडवल असून दिव्यांग बांधवांसाठी कर्ज देण्याची मर्यादा 50 हजार रुपये आहे, ती वाढवून अडीच लाख रुपये करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
- रोजगार स्वयंरोजगासाठी कौशल्य प्रशिक्षण देणारी योजना कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने करावी जेणे करून दिव्यांग बांधवांना रोजगाराची संधी मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कर्ज वाटप प्रक्रीया फास्ट ट्रॅकवर आणणार
केंद्र सरकारच्या योजनांचा राज्यातील दिव्यांगांना जास्तीतजास्त लाभ मिळेल यासाठी विभागाने आणि महामंडळाने प्रयत्न करावे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कर्ज वाटप प्रक्रीया फास्ट ट्रॅकवर आणावी त्यासाठी मोबाईल ॲप, हेल्पलाईन यासारख्या तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. दिव्यांगांना उच्च शिक्षणासाठीची कर्ज योजना आहे त्याबाबत जाणीवजागृती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
इ- रिक्षांचे होणार वाटप
गेल्या वर्षी महामंडळामार्फत बॅटरीवर चालणाऱ्या 797 रिक्षा दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी मंजूर करण्यात आल्या. त्यापैकी 600 रिक्षांचे वाटप करण्यात आले असून यावर्षी देखील 667 रिक्षा खरेदी करण्यासाठी आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 100 टक्के दिव्यांगत्व असलेल्यांना रिक्षा वाटपासाठी प्राधान्य देण्यात येत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर मुख्यमंत्री वयोश्री योजना, लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ योजना आणल्या जात आहेत. त्यानंतर आज मुंबईत दिव्यांग कल्याण मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत दिव्यांगासाठीचे महत्वाचे निर्णय घेण्यात आले. दिव्यांग्याचे प्रश्नांवर आवाज उठवणारे प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.












Click it and Unblock the Notifications