वाढवण बंदर प्रकल्प देशासाठी गेमचेंजर ठरणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, 'आजचा दिवस पालघरच्या इतिहासात महाराष्ट्राच्या व देशाच्या इतिहासातील सोनेरी दिवस आहे. वाढवण बंदर प्रकल्प गेम चेंजर प्रकल्प आहे. महाराष्ट्राला तर याचा फायदा होईलच, पण आपल्या देशाला व पालघरच्या जनतेला सर्वाधिक होईल.
मुख्यमंत्री म्हणाले की, मागील 30-35 वर्षांपासून हा प्रकल्प सुरु झाला नव्हता. मात्र मोदींच्या हातात सफलतेचा पारस आहे. त्यांच्या हस्ते भूमिपूजन व्हावा असा योग असणार. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर हे बंदर मार्गी लागत आहे. जसे त्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले, तसेच बंदर प्रकल्पाचे उद्घाटनही मोदींच्या हस्ते होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही - शिंदे
एकनाथ शिंद म्हणाले की, या बंदरामुळे डहाणू पालघरला जगाच्या नकाशावर मोलाचे स्थान मिळणार आहे. महाराष्ट्रासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. या बंदरामुळे आयात व निर्यातीस अधिक चालना मिळेल, जागतिक व्यापारात भारताचे सामर्थ्य वाढेल. स्थानिकांना रोजगार, नोक-या देखील मिळती वाढवण बंदर विकासात मच्छीमार स्थानिकांना न्याय दिला जाईल. कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. पर्यावरणाची आपण काळजी घेत आहोत. नरीमन पॉईंट पासून कोस्टल रोड विरार, ते पालघर पर्यंत आणण्याचा सरकार विचार करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
'सिंगापूर, कोलंबोवर भारताला अवलंबून राहावे लागणार नाही
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले जेव्हा आखाती देशांत किंवा इतर देशांत आयात-निर्यात करावी लागत होती तेव्हा भारताला सिंगापूर, कोलंबो सारख्या बंदरांवर अवलंबून राहावे लागयचे. आता या वाढवण मुळे या बंदरांवर आता भारताला अवलंबून राहावे लागणार नाही. दिघी पोर्टच्या विकासाला देखील दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारने आता हिरवा झेंडा दाखवला आहे. म्हणून दिघी बंदरा शेजारी हे दुसरे औद्योगिक मोठे बंदर असेल. मुंबईला वैश्विक फिनटेक शहरात बदलण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.' त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो असे मुख्यमंत्री म्हणाले.












Click it and Unblock the Notifications