Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ज्यांना सर्व देण्याची संधी होती त्यांनी मराठा समाजाला काहीच दिले नाही - CM शिंदेंचा विरोधकांवर आरोप

"ज्यांना सर्व देण्याची संधी होती त्यांनी मराठा समाजाला काहीच दिले नाही, 1994 साली असेल किंवा त्यानंतर त्यांनी मराठा समाजाला काहीच न देता फक्त त्यांचा वापर करुन घेतला असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विरोधकांवर केला.

मराठा समाजाला न्याय देण्याची आमची भूमिका स्पष्ट आहे. त्यांनी (विरोधकांनी) त्यांची भूमिका स्पष्ट ठेवावी असंही त्यांनी यावेळी म्हटले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी छत्रपती संभाजीनगर येथे आज ध्वजवंदन आणि भाषणानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली.

CM Eknath Shinde on Uddhav Thackeray

..तर सरकार सोडणार नाही, जेलमध्ये घालू

एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या कांदा आणि कापसाला भाव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या पीकविमा निधी अथवा नुकसान भरपाईत कुणी गफला करु नये. शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना सरकार सोडणार नाही, अशांना सरकार जेलमध्ये घालेल.

मराठा समाजाने सहकार्याची भुमिका ठेवावी

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका दुटप्पी नाही आणि ती कधी नव्हतीही. आज मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत हे आमच्या सरकारचे मोठे यश आहे. मराठा समाजाला आरक्षण आ्मच्या सरकारने दिलं. आम्ही कुठल्याही स्थितीत कुणाला दुखवणार नाही.दिशाभूल करणार नाही. जे देऊ ते कायद्याच्या चौकटीत असेल. कायद्यात टिकणारे आरक्षण दिले जाईल.

मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न

सगे सोयरे, गॅझेटवर जस्टीस शिंदे समिती काम करत आहे. मराठा समाजाच्या मुलांसाठी नोकऱ्या, सारथीसाठी निधी दिला. मराठा समाजाला न्याय देण्याची आमची भूमिका स्पष्ट आहे. कुणाची दिशाभूल आम्ही करणार नाही. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही सरसावलो आहे. सरकारने एवढे केल्यानंतर मराठा समाजानेही आमच्याप्रती सहकार्याची भूमिका ठेवावी.

विरोधकांना जोरदार टोला

ज्यांना सर्व देण्याची संधी होती त्यांनी मराठा समाजाला काहीच दिले नाही, १९९४ साली असेल किंवा नंतर त्यांनी मराठा समाजाला काहीच न देता फक्त त्यांचा वापर करुन घेतला. मराठा समाजाला न्याय देण्याची आमची भूमिका स्पष्ट आहे. त्यांनी (विरोधकांनी) त्यांची भूमिका स्पष्ट ठेवावी.

लाडकी बहिण योजनेला विरोधकांचा विरोध

एकीकडे विकास दुसरीकडे उद्योग, तिसरीकडे लाडकी बहिण योजना अशा सर्व गोष्टी आम्ही करत आहोत. लाडकी बहिण योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोडा घातल्याशिवाय त्या राहणार नाही. विरोधक लाडकी बहिण योजना रद्द व्हावी म्हणून कोर्टात जातात हे योग्य नाही. आम्हाला आमच्या कामाची पावती जनता जनाधर्न देईल आणि महायुती पुन्हा या राज्यात सत्तेत येईल. आगामी काळात निवडणुकीत यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+