मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांना एकनाथ शिंदे यांनी दिली गती, रखडलेले प्रकल्पही लावले मार्गी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे झपाटून काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात. राज्याच्या हिताचा एखादा प्रकल्प नेटाने पूर्ण करून घेणे आणि त्यासाठी संपूर्ण यंत्रणा ताकतीने कामाला लावणे ही या तिघांचीही वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे या तिघांनी हाती घेतलेले काम त्वरेने पूर्णत्वास जाते हा राज्याचा आजवरचा अनुभव आहे. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखालील राज्य सरकारने विशेषत्वाने गती दिली आहे. कोणत्याही पायाभूत सुविधा राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देतात, त्यामुळे रोजगाराची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांच्या सरकारने पूर्णत्वास नेलेले राज्यातील प्रकल्प राज्याला आणि राज्यातील नागरिकांना लाभदायक ठरत आहेत.
मुंबई हे प्रचंड वेगाने वाढणारे शहर आहे.या शहराला देशाची आर्थिक राजधानी असे म्हटले जाते.आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक रोज मुंबईकडे येत असतात. आज मुंबई तिन्ही रेल्वे मार्गावर प्रचंड विस्तारली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर डहाणू पर्यंत, मध्य रेल्वे मार्गावर कर्जत खोपोली पर्यंत आणि हार्बर रेल्वे मार्गावर पार पनवेल पर्यंत मुंबईचा विस्तार झाला आहे.

अटल सेतूमुळे महा मुंबई परिसरात आता मुंबई विस्तारत आहे. अक्राळ विक्राळपणे विस्तारणाऱ्या या शहराच्या विकासासाठी आणि येथील नागरिकांना वाहतुकीसाठी चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. हे ओळखूनच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महामुंबई परिसरात आणि मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीए यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रदेशात पायाभूत सुविधा निर्मितीला विलक्षण गती दिली आहे. गेल्या दोन वर्षात बदलत्या मुंबईचे प्रगतीमान चित्र प्रत्येकाला दिसत आहे. मुंबईच्या प्रमुख रेल्वे मार्गांबरोबरच अंतर्गत भागात लोकांना ये जा करण्यासाठी मेट्रो अत्यंत महत्त्वाची आहे. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखालील महायुती सरकारने मुंबईच्या मेट्रो प्रकल्पांची प्राधान्याने पूर्तता केली
मेट्रो 2 ए पूर्णत्वास
जवळपास 18 किलोमीटर लांबीची आणि 17 स्थानके असलेली मुंबई मेट्रो लाईन 2 ए एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातच पूर्णत्वास गेली. दहिसर ते डी एन नगर दरम्यानच्या 17 स्थानकावरून ही मेट्रो धावते. रोज सव्वा लाख मुंबईकर या मेट्रो ने प्रवास करतात. 6410 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाची पूर्तता करून एकनाथ शिंदे सरकारने पश्चिम उपनगरातील मुंबईकरांना एक भेट दिली आहे. त्याबरोबरच मुंबई मेट्रोची लाईन 7 ही अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्व स्थानकांना जोडते. 16 किलोमीटर लांबी असलेल्या या मेट्रो मार्गावर तब्बल तेरा स्थानके येतात. जवळपास 75 हजार प्रवासी रोज या मेट्रोन प्रवास करतात. दोन्ही मार्गिकांच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारी 2023 रोजी करण्यात आले. या दोन्ही मार्गीकामुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा प्रवासाचा वेळ 50 ते 75% कमी झाला आहे.
मेट्रो 3 ची रखडपट्टी संपवली
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेला मुंबई मेट्रो तीन हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या आणि विशेषतः उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांच्या अहंकारामुळे रखडवण्यात आला.सुरुवातीला 23 हजार कोटी रुपये एवढा खर्च असलेल्या या प्रकल्पाची किंमत महाविकास आघाडी सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे 37000 कोटी रुपयांपर्यंत वाढली.
2022 साली सत्तेत येतात एकनाथ शिंदे सरकारने मेट्रो 3 च्या मार्गीकेला प्रचंड गती दिली. या मार्गीकेच्या पहिल्या टप्प्याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे. आरे कॉलनी ते बीकेसी असा मेट्रो तीनच्या मार्गीकेचा पहिला टप्पा कार्यान्वित करण्यात आला आहे. डिसेंबर 2024 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत होणार आहे. रोज हजारो प्रवासी मुंबई मेट्रो तीन प्रवास करत आहेत. स्वच्छ आणि भव्य रेल्वे स्थानके हे या मेट्रोचे वैशिष्ट्य आहे. मेट्रो तीन मुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार असून मुंबईकरांची प्रदूषणातूनही काहीशी मुक्तता होणार आहे.
"महाविकास आघाडी सरकारने अडथळे आणले नसते तर मेट्रो तीन पूर्ण क्षमतेने 2023 साली कार्यरत झाली असती. या प्रकल्पाच्या वाढलेल्या खर्चामुळे राज्याचे नुकसान झाले. महाविकास आघाडीने हे नुकसान केले नसते तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपये देता आले असते" असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच बोलताना केला होता.
बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती महाविकास आघाडी सरकारने अस्मितेच्या नावाखाली अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना कोलदांडा घातला.त्यातला आणखी एक महत्त्वाचा आणि मुंबईसाठी लाभदायक ठरणारा प्रकल्प म्हणजे अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प. महाविकास आघाडी सरकारने एक लाख आठ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पात अनेक अडथळे आणले. मात्र महायुती सरकार पुन्हा सत्तेत येताच एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या मार्गातील सर्व प्रशासकीय अडथळे तातडीने दूर केले आणि भूसंपादन प्रक्रियेला गती दिली. 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल आणि मुंबई अहमदाबाद ही पहिली बुलेट ट्रेन धाऊ लागेल, असा विश्वास आहे.
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका!












Click it and Unblock the Notifications