Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महायुतीने मांडले रिपोर्टकार्ड, महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी सांगितलं विकासाचं व्हिजन...

मुंबई : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुतीने आज पत्रकार परिषद घेत आपले रिपोर्टकार्ड प्रसिद्ध केले. पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन-अडीच वर्षांत महायुतीने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. विरोधांकडून फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

काय म्हणाले अजित पवार

पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच धूतलं. ते म्हणाले, आज आम्ही आमच्या दोन वर्षांचे रिपोर्टकार्ड दाखवत आहोत. महायुतीने तिजोरी मोकळी केली असे काहींनी आरोप केले. शेवटच्या अर्थसंकल्पात काही योजना आणल्या त्याचीही टिंगलटवाळी करण्यात आली. लाडकी बहिण योजनेबाबतही संभ्रम निर्माण करण्यात आला. त्यामुळेच आम्ही हे दोन पानांचं सुटसुटीत रिपोर्टकार्ड तयार केलं. आमच्या मेहनतीचा आणि बदलत्या महाराष्ट्राचा हा लेखाजोखा आहे. सर्व प्रगती पाहून विरोधक गोंधळले आहेत, असा टोला अजित पवारांनी लगावला.

Mahayuti sarkar

महाराष्ट्राला कुलूपबंद कऱण्याचा मविआचा प्रयत्न

देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषदेतून मविआवर आगपाखड केली. ते म्हणाले, आमचा विरोधी पक्ष लाडकी बहीण योजनेबाबात टीका करतोय. दुसरीकडे तेच विरोधक या योजनेचे पैसे आम्ही वाढवू असंही म्हणतोय. सरकारकडे या योजनांसाठी पैसे आहेत की नाही, हे विरोधकांनी ठरवल पाहिजे. विरोधी पक्षच कन्फ्युज आहे. ते योजनाही जाहीर करत आहेत .पण बजेटमध्ये पैसेही नसल्याचे म्हणत आहेत.

मला वाटतं त्यांचा पर्दाफाश झाला आहे. लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेस नेते कोर्टात गेले आहेत. उद्धव ठाकरेही महायुतीच्या सगळ्या योजना आम्ही बंद करणार असल्याचं, सांगताहेत. मुळातच मागील अडीच वर्षे त्यांनी जशा सर्व योजनांवर स्थगिती आणली होती. तसेच आताही ते या योजनांवर स्थिगिती आणून महाराष्ट्राल कुलूप बंद कऱण्याचा यांचा प्रयत्न आहे. पण तो कधीही यशस्वी होणार नाही.

विरोधकांना पराभव दिसू लागलाय- शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, दावोस मध्ये पाच लाख कोटींचे करार केले. महाराष्ट्रात दोन लाख कोटींचे करार झाले. आम्ही उद्योजकाना रेड कार्पेट दिले. त्यावेळी कुणी विचारत नव्हते. महाराष्ट्रात उद्योगांचे प्रमाण वाढत आहे. अगदी गडचिरोलीपर्यंत इंडस्ट्रीज गेली आहे. आदिवासी भागातही इंडस्ट्रीज गेल्या, मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होत आहे. हाताला काम मिळत आहे. हे सर्व करत असताना आम्ही तुमच्यासमोर उद्योगांचे चित्र मांडत आहोत.

मुंबईत येत्या काही दिवसात 8.-90 हजार कोटींचे सेमी कंडक्टर प्रोजक्ट येणार आहेत. विरोधकांना आता पराभव दिसू लागलाय, ते गोंधळलेत, बिथरलेत. काम केलेले रिपोर्टकार्ड सादर कऱण्यासाठी हिंमत लागते. पण ती हिंमत असण्यासाठी कामे करावी लागतात. ही विकासकामे आम्ही या रिपोर्टकार्डमध्ये मांडली आहेत. महायुतीने गेल्या दोन अडीच वर्षात जे काम केलंय ते कौतूकास्पद आहे.

पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. अटलसेतू, समृद्धी हायवे, मुंबई-पुणे हायवे, यांसारखे प्रकल्प राज्याच्या विकासाला गती देणार आहेत. अशा प्रकल्पांमुळे राज्याची प्रगती वेगाने होत असते. गेल्या दोन सव्वादोन वर्षे आणि मागची अडीच वर्षांची तुलना केली तर महाविकास आघाडीच्या सरकारने अनेक प्रकल्प बंद पाडण्याचं काम केलं. आरे कारशेडचे काम चालू केल नसतं तर मेट्रो 3 चं काम अजून 10 वर्षे पूर्ण झालं नसतं.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+