जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आज विशेष विमानाने मुंबईत परतणार, पहा संपूर्ण यादी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना अखेर मुंबईत परत आणण्यात येत आहे. आज इंडिगो आणि एअर इंडिया या दोन विशेष विमानांद्वारे एकूण 183 पर्यटकांना मुंबईत आणण्यात येणार आहे, त्यापैकी पहिल्या इंडिगो विमानात 83 प्रवाशांचा समावेश आहे.
याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडिया पोस्टव्दारे दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये आहे की, श्रीनगरहून मुंबईकडे महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना घेऊन येणाऱ्या पहिल्या विमानातील पर्यटकांची यादी अंतिम करण्यात आली असून यात 83 प्रवाशी गुरुवारी महाराष्ट्रात परत येणार आहेत.

पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी सहा जण महाराष्ट्रातील होते. या हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, परंतु महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलून महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षित परतण्याची व्यवस्था केली आहे.
काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील 100 पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल. या विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 24, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर आज 2 विशेष… pic.twitter.com/WqRdPkWs2L
या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलली. 24 एप्रिल रोजी दोन विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिले इंडिगो विमान 83 प्रवाशांना घेऊन संध्याकाळी मुंबईत पोहोचणार आहे तर दुसरे एअर इंडिया विमान 100 प्रवाशांसह त्याच दिवशी पोहोचणार आहे. या विमानांच्या खर्चाची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने उचलली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रवाशांच्या यादीबाबत माहिती दिली आणि त्यांच्या सुरक्षित परतण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे सांगितले.
महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू
या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेहही विशेष विमानांद्वारे मुंबई आणि पुण्यात आणण्यात आले आहेत.पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे पार्थिव आज सकाळी पुण्यात आणण्यात आलं. यावेळी नागरी विमान सेवा व सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री दत्तात्रय भरणे आणि माधुरी मिसाळ उपस्थित होते. त्यांनी पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
आज पहाटे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली ! pic.twitter.com/mhwiZGU06V
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 24, 2025
पहलगामला 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखले जाते. दरवर्षी देशभरातून लाखो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येत असतात.. 22 एप्रिल रोजी दुपारी 2:45 वाजता चार दहशतवाद्यांनी या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार सुरू केला, ज्यामुळे 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचाही मृत्यू झाला, ज्यामध्ये मुंबईतील अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेले आणि दिलीप दिसले, तसेच पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा समावेश आहे. या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.
-
विश्वविजेत्या इंडियाचे 'बाप्पा'ला साकडे! सिद्धिविनायकाच्या चरणी T20 वर्ल्डकप ट्रॉफीसह गंभीर-सूर्या! -
आजचे राशीभविष्य: सोमवार १६ मार्च २०२६, 'या' राशींना होणार प्रचंड धनलाभ; पाहा तुमची रास! -
अदानी समूहाचा मोठा निर्णय: देशात उभारणार 300 शाळा, 30 रुग्णालये; 60 हजार कोटींची गुंतवणूक -
Eid ul fitr 2026 wishes marathi hindi: इदनिमित्त खास मराठी-हिंदी 20 शुभेच्छा संदेश वाचा आणि शेअर करा -
Devendra Fadnavis : गॅस टंचाईची भीती हा काँग्रेसचा कुटील डाव; देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप -
आजचे राशिभविष्य 15 मार्च 2026 : 'या' राशींच्या नशिबात राजयोग! कोणाला मिळणार पैसा आणि कोणाला यश? वाचा -
IPL 2026 : मैदानावरचा शेवटचा 'हेलिकॉप्टर शॉट'? आयपीएलनंतर धोनीसह 'हे' 5 दिग्गज घेणार निवृत्ती -
अदानी टोटल गॅसकडून औद्योगिक ग्राहकांसाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या दरात कपात -
इराण-इस्त्रायल युद्धावर RSSने मांडली भूमिका; सरकार्यवाह होसबळे यांनी मोदी सरकारचे केले समर्थन! -
29 वर्षांपूर्वीची दुखापत अन् सक्तीची विश्रांती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर शस्त्रक्रिया! -
Baramati Bypoll 2026 : सुनेत्रा पवार रिंगणात, पण 'बिनविरोध'ची शक्यता धूसर? जाणून घ्या नेमकं समीकरण -
चांदीच्या दरात मोठी घसरण! इराण युद्धाच्या सावलीत किमती कोसळल्या; जाणून घ्या आजचे ताजे दर!







Click it and Unblock the Notifications