Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राहुल गांधींच्या आरोपावर मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर म्हणाले- मतांची चोरी झालीच नाही!

देशात मतांच्या चोरीसंदर्भातील मुद्दा गाजत असून काँग्रेस खासदार तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर त्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत त्यांनी सविस्तर निवेदन देत पुरावेही दिले आहेत. त्यानंतर आता राज्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीचे आरोप नाकारले असून निवडणूक आयोगाची पाठराखण केली आहे. राहूल गांधी आपले नुकसान दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. भविष्यात ते पराभूत होणार आहेत. ते देशाच्या संवैधानिक संस्थांची प्रतिमा खराब करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Rahul Gandhi s allegations on ECI

Take a Poll

नेमके काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

लोकसभा खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एनआयशी बोलताना म्हणाले, "महाराष्ट्रात किंवा देशाच्या इतर कोणत्याही भागात मतांची चोरी झालेली नाही... राहुल गांधी फक्त खोटे बोलत आहेत आणि जनतेचा जनादेश चोरत आहेत... त्यांचे आकडेही बदलत राहतात.

राहुल गांधींना जनता धडा शिकवेल - फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "गेल्या वेळी त्यांनी महाराष्ट्रात मतांची संख्या ७५ लाखांनी वाढल्याचे नमूद केले होते. आता ते म्हणत आहेत की एक कोटी मते वाढली आहेत... ते फक्त खोटे बोलून आपले नुकसान दडपण्याचा प्रयत्न करत आहेत... त्यांना माहित आहे की भविष्यात ते पराभूत होणार आहेत, तसेच... ते देशाच्या संवैधानिक संस्थांची प्रतिमा खराब करत आहेत... मी याचा निषेध करतो आणि येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल"

काय होता राहुल गांधींचा आरोप?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत "मोठ्या गुन्हेगारी घोटाळ्याचे" पुरावे सादर केले. नेत्यांना दिलेल्या पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनमध्ये गांधी यांनी दावा केला की, कर्नाटकातील फक्त एकाच विधानसभा मतदारसंघात एक लाखाहून अधिक मते "चोरली" गेली, ज्यासाठी त्यांनी पाच वेगवेगळ्या प्रकारे फेरफार केल्याचा आरोप केला.

एक कोटी मतदार जोडल्याचा आरोप

लोकसभा निवडणुकीत १ कोटी मतदार जोडल्याचा आरोप राहुल गांधी यांनी लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीदरम्यान एक कोटी नवीन मतदार जोडल्याबद्दल बोलले. राहुल गांधी यांनी असेही निदर्शनास आणून दिले की संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मतदानाच्या टक्केवारीत असामान्य वाढ झाली होती, तर त्यावेळी मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी नव्हती.

हेही वाचा : एकाच व्यक्तीचे तीन राज्यांत मतदान, राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+