Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सरन्यायधीश भुषण गवईंनी कायद्याचे शिक्षण का घेतले? सत्कार सोहळ्यात एकनाथ शिंदेंनी व्यक्त केल्या भावना

"सरन्यायधीश भूषण गवई यांचे वडिल आणि लोकनेते रामकृष्ण सूर्यभान तथा दादासाहेब गवई यांनाही वकीलीचे शिक्षण घ्यायचे होते, पण ते शिक्षण घेऊ शकले नाही. वडिलांचे अर्धवट राहीलेले स्वप्न मुलगा म्हणून भूषण गवई यांनी पुर्ण केले" असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायधीश गवईंबद्दल गौरवोद्गार काढून आपल्या भावना व्यक्त केल्या.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज विधिमंडळात सत्कार सोहळा सुरु आहे. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. न्यायमूर्ती भूषण गवई यांची देशाच्या ५२ व्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव विधान परिषदेत संमत झाला. सभापती राम शिंदे यांनी हा प्रस्ताव सादर केला. सभागृहानं तो एकमताने मंजूर केला. त्यानंतर आता हा दिमाखदार कार्यक्रम होत आहे.

CJI felicitation ceremony

एक आदर्श नागरीक, संवेदनशील माणूस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कायद्याच्या चौकटीत राहून सरन्यायधीश भूषण गवई यांनी माणुसकीचे तत्व कायम जपले. सरन्यायधीश गवई यांचे व्यक्तिमत्व केवळ न्यायमुर्ती म्हणून नव्हे तर एक आदर्श नागरीक, एक कठोर मेहनती विद्यार्थी आणि एक संवेदनशील माणून म्हणूनही प्रेरणादायी आहे.

सरन्यायधीशांनी त्यांच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे म्हणाले, वडिलांची राजकीय पार्श्वभुमी असताना त्याचा वापर न करता भूषण गवई यांनी गुणवत्ता आणि प्रामानिक कर्तृत्वाच्या जोरावर एवढी मोठी झेप घेतली हे एक मोठे उदाहरण आहे. सरन्यायधीश भूषण गवई यांचे वडिल आणि लोकनेते रामकृष्ण सूर्यभान तथा दादासाहेब गवई यांनाही वकील व्हायचे होते पण ते शिक्षण घेऊ शकले नाही. वडिलांचे अर्धवट राहीलेले स्वप्न मुलगा म्हणून भूषण गवई यांनी पुर्ण केले. वकील होऊन पैशांच्या मागे लागशील न्यायधीश झालास तर देशाचे पांग फेडशील हा वडिलांचा सल्ला ऐकून भूषण गवई यांनी कायद्याचे शिक्षण घेतले असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

एकनाथ शिंदे म्हणाले, आर्किटेक्ट होऊन भूषण गवईंनी त्या क्षेत्रातही देशाचे नाव उज्ज्वल केले असते कारण एक अस्सल हिरा कुठेही चकाकतोच.. निपक्षः न्यायमुर्ती देशाला मिळाले हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. शिका , संघटीत व्हा आणि शासनकर्ती जमात बना हा मुलमंत्र भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. सरन्यायधीश गवई यांनी हा मंत्र जीवापाड जपला आणि खरा करुन दाखवला.

एकनाथ शिंदे म्हणाले, सरन्यायधीशपदाच्या शपथविधीनंतर भूषण गवई यांनी आपल्या मातोश्रींच्या पाया पडून कृतज्ञता व्यक्त केली हे आपण पाहीीले आहे. महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच हा दिवस पाहता आला असे उद्गगार त्यांच्या मातोश्रींनी काढले. माय-लेकाचे संविधानाप्रती असलेल्या नात्याचे हे एक प्रतिक आहे. मोठ्या पदावर असतानाही विनयशीलता, शालीनता आणि नम्रता पाहून मी विचार केला की, अशी दुर्मिळ माणसंही असतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+