आज सरन्यायधीशांचा सत्कार; विरोधी पक्षनेताच नाही म्हणत विरोधकांचा सभात्याग! विधानभवनात काय घडलं? वाचा
CJI Bhushan Gavai felicitated Vidhan Bhavan today : सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायधीशपदी महाराष्ट्राचे सुपूत्र भूषण गवई यांची नियुक्ती झाली. महाराष्ट्रातील नागपूर येथील असेलेले सीजेआय भूषण गवई यांची ही नियुक्ती महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे आणि यामुळेच त्यांचा सत्कार घेण्याचा ठराव विधीमंडळात अधिवेशन सुरु झाल्यानंतर घेण्यात आला होता. आज ८ जुलै २०२५ रोजी विधिमंडळात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश भूषण गवई यांचा सत्कार होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायधीशांच्या सत्काराच्या गौरवास्पद क्षणी सभागृहाला विरोधी पक्षनेता नसणे हे योग्य नाही असे म्हणत विरोधकांनी सभापती राहुल नार्वेकरांकडे विरोधी पक्षनेत्याच्या संदर्भात निर्णय घेण्याची मागणी करत सभात्याग केला.

1. विधानसभेच्या नियमित कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात होण्यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी, भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार आज विधानभवनात होत असताना विधानसभेत विरोधी पक्षनेता नसणं हे योग्य नाही, असा मुद्दा उपस्थित केला.
2. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनीही हा लावून धरत आक्रमक पवित्रा घेतला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, याचा निर्णय घेण्याचा अधिकार आपला असून यावर सभागृहात चर्चा घेणं योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला.
3. विरोधी पक्षनेतेपदाबाबतचा निर्णय कधीपर्यंत घेणार ते अध्यक्षांनी सांगावं अशी मागणी विरोधकांनी यावेळी केली. त्यावर, अशी कालमर्यादा ठरवण्याची मागणी योग्य नसल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं. यावर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अध्यक्षांची ही भूमिका लोकशाहीविरोधी असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यानंतर या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला.
मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस काय म्हणाले?
प्रश्नोत्तराचा तास करु.. सीजेआय भूषण गवई यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडूया. त्यानंतर मी पण अध्यक्षांना विनंती करतो की, भास्कर जाधव यांना बोलण्याची संधी द्या असे विधानसभा अध्यक्षांना मी विनंती करतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
आज आपण सर्वजण महाराष्ट्राचे सुपूत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश भूषण गवई यांच्या सत्कारासाठी आपण सर्वच उत्सुक आहोत. एक भुषणावह अशी गोष्ट या विधीमंडळाच्या सभागृहात घडत आहे एक ऐतिहासिक सत्कार सोहळा होत आहे. ज्यावेळी असे सोहळे होतात त्यावेळी त्या मंचावर विरोधीपक्षनेता असेल तर लोकशाही परंपरेला अभिमान आणि स्वाभीमानाची गोष्ट समजली जाते. विरोधी पक्षाची अशा सत्कार समारंभाला खुर्ची रिकामे ठेवणे योग्य वाटते का..विरोधी पक्षपदाचा निर्णय घेत नाही हे कितीकाळ चालणार..सर्वांसाठी ती खुर्ची महत्वाची आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींचे या सभागृहात आगमन होत आहे.पण आता आम्हाला पायरीवर नाही पण सभागृहात आम्हाला न्याय मिळत नाही अशी आमची भावना आहे. त्यामुळे आम्ही सभात्याग करण्याचा निर्णय घेतला.












Click it and Unblock the Notifications