आता तुमची सरकारी कामे घरबसल्या होणार! CM देवेंद्र फडणवीसांचा 'हा' आहे खास टार्गेट प्लॅन..
Citizens Government work will be done from home : महायुती सरकार राज्यात आल्यापासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून काही न् काही वेगळे अन् नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या मााध्यमातून जनतेची कामे पुर्ण व्हावी हा त्यांचा उद्देश आहे. लोकहिताला प्राधान्य देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस हे वारंवार आपल्या भाषणात सांगतात, त्यामुळेच आता मुख्यमंत्री फडणवीस नवीन ध्येय घेऊन खास गोष्टी करण्याच्या प्रयत्नात आहेत हे त्यांनी आज अकोल्यात स्पष्ट केले.
लोकांना सरकारी कार्यालयात आजही अनेक गोष्टींसाठी वारंवार खेटे मारावे लागतात. अनेकदा सरकारी काम अन् महिनाभर थांब असे अनुभवाचा प्रत्येय अनेकांनी अनुभवला आहे. आता यापुढे नागरिकांची कामे घरबसल्या व्हावीत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी सरकारी कार्यालयांतच स्पर्धा निर्माण करुन सुशासनासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सरकारी कामाबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
अकोल्यात आयोजित अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे कार्यकर्ता संवाद संमेलनात बोलत होते. यापुढे प्रशासनाला दीडशे दिवसांचे टार्गेट देण्यात येत असून सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात न जाता घरी बसल्या ही कामे करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. त्यासाठी व्हाट्सअप सारख्या समाज माध्यमांशी करार करण्यात येणार असून प्रत्येक नागरिकाला शासकीय कामे भविष्यात त्याच्या व्हाट्सअपवर उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले.
सरकारी कार्यालयांना आता दीडशे दिवसांचे टार्गेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला की, भारतीय जनता पक्षाचे सरकार राज्यात सत्तेवर येतात पहिल्या शंभर दिवसांची झलक दिल्याने सुस्त प्रशासनाला त्याने कामाला लागले. शासनाच्या विविध कार्यालयात स्वच्छता झाली, लोकांच्या तक्रारी कमी झाल्या आणि हा जनतेचा मोठा विजय असल्याचे ते म्हणाले.
अकोल्याच्या विकासासाठी ₹2618.55 कोटी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकोला जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रातील ₹2618.55 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन, कोनशिला व लोकार्पण आज केले . अकोलावासीयांच्या स्वप्नांना साकार करण्याच्या दिशेने उचललेले एक भक्कम पाऊल त्यांनी उचलले आहे. रखडलेला काठीपाठी बेरीज प्रकल्पासाठी 550 कोटी रुपये, नवीन हॉस्पिटल साठी 150 कोटी रुपये, आणि महानगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेसाठी 750 कोटी रुपये देण्यात येणार असून महानगरपालिकेला भरावयाच्या 30 टक्के निधी सुद्धा राज्य सरकार भरणार असल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार काम करत असून गेल्या 25 वर्षापासून रखडलेले सिंचनाची कामे 2027 पर्यंत होणार आहेत. हा सिंचनाचा बॅकलॉग पूर्ण भरून काढण्याचे टार्गेट ठेवण्यात आले असून यापुढे बॅक लॉक होणार नाही. वैनगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्प हा महत्त्वकांक्षी प्रकल्पामुळे अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम या जिल्ह्यातील जमीन पाण्याखाली येणार आहे. या नदी जोड प्रकल्पामुळे विदर्भातील कोरडवाहू शेती नेहमीसाठी बागायती होणार असल्याचे ते म्हणाले.












Click it and Unblock the Notifications