Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आनंदाची बातमी..! मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर धावणार मेट्रो; वाचा, फडणवीसांनी नेमकं काय आहे स्वप्न

शहरांचा विकास हा वाहतुकीतून होतो, असं म्हणतात. मुंबईत तर रेल्वे, लोकल जीवनवाहिनी समजली जाते. मुंबईत मेट्रो तुलनेने कमी आहे. मात्र आता राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मेट्रो कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी टार्गेट सेट केलं आहे. महाराष्ट्रात दरवर्षी ५० किमीचं मेट्रोचे नेटवर्क उभारण्याचं टार्गेट मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमएमआरडीएला दिलं आहे.

Devendra Fadnavis

फडणवीसांनी घेतला आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी प्रकल्पांचा कामाला उशीर होऊ देऊ नका, असे स्पष्ट निर्देश त्यांन दिले. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, काम पूर्ण करण्याची डेडलाइन तयार करा, दरवर्षी 50 किलोमीटर मेट्रो लाईन सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु झाली पाहिजे. मुंबईतील अनेक मेट्रो प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीला नवीन डेडलाइन निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरवर्षी ५० किमीचं टार्गेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेताना आता कामात उशीर होता कामा नये, असं सांगितलं. काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा नवीन मुदत द्यावी. तसंच दरवर्षी ५० किमीची लाईन सर्वसामान्यांसाठी खुली करावी, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. सध्या मुंबईतील अनेक मेट्रो प्रकल्प दिलेल्या मुदतीपेक्षा मागे आहेत. त्यावरुनच मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला नवीन मुदत देण्याचं सांगितलं आहे.

मुंबईत कोणत्या मार्गावर सुरु होणार मेट्रो?

मेट्रो १२ - कल्याण ते तळोजा, सुरुवाती स्तरावर काम सुरू
मेट्रो १० - गायमुख ते शिवाजी चौक - मीरा रोड, काम अद्याप सुरू होणं बाकी आहे
मेट्रो २ बी - डीएन नगर ते मंडाले, ८० टक्के काम पूर्ण (२३.६ किमी)
मेट्रो ४ आणि ४ ए - वडाला ते कासर वडवली आणि गायमुखपर्यंत, ८० टक्के काम पूर्ण
मेट्रो ५ - ठाणे - भिवंडी - कल्याण, ९५ टक्के काम पूर्ण (२४.९ किमी)
मेट्रो ६ - स्वामी समर्थ नगर - विक्रोळी, ७७ टक्के सिव्हिल वर्क (१४.५ किमी)
मेट्रो ९ आणि ७ ए - दहिसर पूर्ण - मीरा-भाईंदर - अंधेरी पूर्व - सीएसएमआयए, ९२ टक्के सिव्हिल वर्क

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+