महाराजांचा पुतळा कसा पडला ? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले "तिथे 45 कि.मी प्रती तास..."
सिंधुदूर्ग : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा दुर्दैवानं कोसळला आहे. यामागचं कारण अद्यापर्यंत कळू शकलेलं नाही. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिननिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवणमध्ये येऊन या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं.
अवघ्या काही महिन्यामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामूळे शिवप्रेमींमध्ये संतपाची लाट उसळली आहे. तर विरोधकांनी पक्षातील नेत्यांनी ही सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "टीका करायला त्यांच्याकडे वेळच वेळ आहे, त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही. झालेली घटना योग्य नाही, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. तो पुतळा नेव्हीकडून उभारला गेला होता, त्याचं डिझाईन नेव्हीने तयार केलं होतं", असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
"त्याठिकाणी 45 किलोमीटर प्रती तास असा वारा वाहत होता, त्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी जात आहेत. नेव्हीचे अधिकारी, आमचे काही अधिकारी उद्या पाहणी करतील. छत्रपती शिवाजी महाराज आमचं आराध्य दैवत आहे, हा पुतळा आम्ही पुन्हा दिमाखात आणि मजबुतीने उभा करू. कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. या राज्यात शांतात राहिले पाहिजे, यासाठी सगळ्यांनी काळजी घ्यावी", असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.
भाजपची घाई, इव्हेंटबाजी, खा. अमोल कोल्हेंची टीका
पंतप्रधानांनी नौदल दिनानिमित्त अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा भाजपची घाई, इव्हेंटबाजी, पंतप्रधानांची वेळ जुळवण्याचा प्रयत्न आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोसळला. आपल्या पंतप्रधानांप्रती व्यक्तीपूजेत तल्लीन असणाऱ्या भाजपने शिवरायांच्या बाबतीत अक्षम्य पाप केलं, असं ट्टिट करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारचा निषेध केला आहे.
पंतप्रधानांनी नौदल दिनानिमित्त अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा भाजपची घाई, इव्हेंटबाजी, पंतप्रधानांची वेळ जुळवण्याचा प्रयत्न आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोसळला. आपल्या पंतप्रधानांप्रती व्यक्तीपूजेत तल्लीन असणाऱ्या भाजपने शिवरायांच्या बाबतीत अक्षम्य पाप केलं,… pic.twitter.com/D0AoQ3lHrt
— Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 26, 2024
कोणालाच सोडू नका,यांना जेलमध्ये टाका- मनोज जरांगे पाटील
हे लोक चांगले काम करत नाहीत. यांना पुतळे कळत नाही, दैवत कळत नाही, छत्रपती शिवराय हे देशाचे दैवत आहेत, ते हिंदू धर्माची अस्मिता आहे. स्मारकाचे काम करणारा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ? कोणीतरी नेताच असणार, कशातही पैसे खायची यांना सवय लागली आहे, सगळ्यांना जेलमध्ये टाका सोडू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे.












Click it and Unblock the Notifications