Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

छत्रपती संभाजीनगर शहरात एकच चर्चा, ज्योतिराम पाटलांचा गेम कुणी केला?

छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) राजकारणात सध्या वावटळ उठली आहे. एकीकडे 'महायुती' तुटल्याचा धमाका झाला असतानाच, या राजकीय भूकंपाच्या ढिगाऱ्याखाली एका निष्ठावान तरुणाच्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. हे नाव आहे- ज्योतिराम पाटील (Jyotiram Patil).

chhatrapati sambhajinagar jyotiram patil political twist

ज्या शहरात राजेंद्र जंजाळ (Rajendra Janjal) यांच्या डोळ्यांतील अश्रूंनी युतीची वज्रमूठ सैल केली, त्याच शहरात आता एका 'सोशल मीडिया स्टार' कार्यकर्त्याच्या अन्यायाची गोष्ट घराघरांत पोहोचत आहे.

लाखांचा पोशिंदा, पण पक्षातच झाला 'परका'

फेसबुक, इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्सचा ताफा असलेला आणि एका हाकेवर हजारो तरुणांची फौज उभी करणारा ज्योतिराम पाटील, हे नाव छत्रपती संभाजीनगरच्या गल्लीबोळांत नवीन नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा शिवसेना (शिंदे गट) आणि संदिपान भुमरे यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू होती, तेव्हा याच ज्योतिरामने जिवाचं रान केलं होतं. भुमरेंना संसदेत पाठवण्यासाठी पडद्यामागे काम करणारा हा तरुण चेहरा, आता महापालिका निवडणुकीत स्वतःसाठी संधी शोधत होता. पण नियतीला आणि कदाचित पक्षातील काही 'बड्या' नेत्यांना हे मान्य नव्हतं अशी चर्चा सध्या सुरू आहे.

जंजाळांचे ते 'अश्रू' आणि ज्योतिरामचा 'गेम'

राजकारणात जे दिसतं, त्यापेक्षा जे दडवलेलं असतं ते अधिक भयानक असतं. २९ जानेवारीला राजेंद्र जंजाळ कॅमेऱ्यासमोर रडले. त्यांनी भाजपवर अन्याय केल्याचा आरोप केला आणि युती तोडण्याची वेळ आणली. पण याच नाट्याचा दुसरा अंक आता समोर येतोय.

चर्चा अशी आहे की, ज्योतिराम पाटील यांची वाढती लोकप्रियता आणि खासदार संदिपान भुमरे-आमदार विलास भुमरे यांच्याशी असलेली त्यांची जवळीक जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना डोकेदुखी ठरत होती. एकेकाळी जंजाळ यांचेच खंदे समर्थक असलेले ज्योतिराम आता स्वतःचे 'किंगडम' तयार करत होते. राजकारणात 'गुरू'ला जेव्हा 'शिष्य' मोठा होताना दिसतो, तेव्हा अनेकदा 'पंख छाटण्याचे' प्रयोग होतात. ज्योतिराम यांच्या बाबतीतही तेच घडल्याचं बोललं जातंय.

"कार्यकर्त्यांच्या संधीसाठी मी माघार घेतोय," असं म्हणणाऱ्या जंजाळांनी प्रत्यक्षात ज्योतिराम पाटील नावाच्या एका धडाडीच्या कार्यकर्त्याचा पत्ता कट करून स्वतःची राजकीय खुर्ची सुरक्षित केली का? असा सवाल आता सोशल मीडियावर विचारला जात आहे.

निष्ठेचा बळी की राजकीय अपरिहार्यता?

खासदार भुमरेंचा जवळचा कार्यकर्ता मानल्या जाणाऱ्या ज्योतिरामला उमेदवारी मिळेल, ही काळ्या दगडावरची रेघ मानली जात होती. मात्र, तिकीट वाटपाच्या वेळी अचानक सूत्रं फिरली. ज्या तरुणाने पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं, त्यालाच सत्तेच्या उंबरठ्यावरून परत फिरवण्यात आलं.

"जर सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळावा ही नेत्यांची प्रामाणिक भूमिका असेल, तर मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं तिकीट का कापलं?" हा ज्योतिराम पाटील यांनी विचारलेला प्रश्न आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या काळजाला घरं पाडणारा ठरत आहे.

बाजीगर कोण?

राजेंद्र जंजाळ यांनी 'अश्रूंचा मास्टरस्ट्रोक' मारून युती तर तोडलीच, पण त्याच सोबतीने पक्षांतर्गत विरोधकांनाही चितपट केलं आहे. मात्र, ज्योतिराम पाटील यांच्यासारखा तरुण आणि जनमानसात प्रभाव असलेला नेता जेव्हा नाराज होतो, तेव्हा त्याचे परिणाम निवडणुकीच्या निकालात उमटतात.

छत्रपती संभाजीनगरच्या या राजकीय रणधुमाळीत आता 'मल्टीपोलर' लढत होणार आहे. पण या सगळ्यात ज्योतिराम पाटील आपली पुढची चाल काय रचणार? तो आपल्या लाखांच्या 'गोतावळ्यासह' शांत बसणार की बंडाचे निशाण फडकवणार? याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+