Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

संभाजीनगरात पंचायत समिती निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा; अंबादास दानवेंचा भाजप उमेदवारावर हल्ला

Ambadas Danve BJP clash : राज्याच्या राजकारणात सध्या सत्तासंघर्ष आणि फोडाफोडीचे राजकारण शिगेला पोहोचले असतानाच, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजपमधील वाद आता थेट रस्त्यावर आणि मारहाणीवर येऊन ठेपला आहे. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजप उमेदवाराची कॉलर पकडून थेट मारहाण केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Ambadas Danve BJP clash

वादाचे मूळ काय?

पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला होता. ठाकरे गटाचा आरोप आहे की, भाजपने सत्तेसाठी फोडाफोडीचे तंत्र अवलंबले आहे. भाजपचे उमेदवार कल्याण गायकवाड यांनी ठाकरे गटाच्या तीन सदस्यांना पळवून नेल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला. पळवून नेलेल्या उमेदवारांमध्ये लताबाई कानडे (पंढरपूर गण), सतीश हिवाळे (वडगाव कोल्हाडी) व दत्तात्रय वर्पे यांचा समावेश होता. हे तिन्ही सदस्य अचानक 'नॉटरिचेबल' झाल्याने आणि भाजपच्या गोटात गेल्याची कुणकुण लागताच ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला.

"ही शिवसेना लक्षात ठेवा!"; दानवेंचा राडा

आपल्या पक्षाचे सदस्य पळवल्याचे समजताच अंबादास दानवे यांनी थेट भाजप उमेदवाराला गाठले. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. संतापलेल्या दानवे यांनी संयम सोडत भाजप उमेदवार कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडली आणि त्यांना मारहाण केली.

या राड्यानंतर माध्यमांशी बोलताना दानवे यांनी आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, "जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती, भाजपचे लोक कुठे पैशांचे आमिष दाखवून तर कुठे धमक्या देऊन आमचे सदस्य उचलून नेतात. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांना उत्तर देणे गरजेचे होते. जोपर्यंत त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळत नाही, तोपर्यंत ते सुधारणार नाहीत. म्हणूनच मी त्यांना पकडले आणि कानाखाली वाजवली."

शिंदे गटावरही निशाणा आणि गंभीर इशारा

अंबादास दानवे यांनी केवळ भाजपवरच नाही, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटावरही तोफ डागली. भाजपने केवळ ठाकरे गटाचेच नाही, तर शिंदे गटाचेही काही सदस्य आपल्या ताब्यात ठेवल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. शिंदे गटात सध्या अंतर्गत दोन गट पडले असून तिथेही अस्वस्थता असल्याचे दानवे यांनी नमूद केले.

दानवे यांचा इशारा

"आमच्या सदस्यांनी भाजपसोबत जाऊ नये यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. पण जर कुणी बळजबरीने किंवा आमिषाने आमच्या लोकांना नेणार असेल, तर पुढे काय होईल याची जबाबदारी आमची नाही. ही शिवसेना आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे," अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+