सभ्य माणसं नाहीत का? तेव्हा छातीत कळ, आता ठणठणीत? भुजबळांच्या मंत्रिपदावरुन दमानियांची पोस्ट चर्चेत
Chhagan Bhujbal Oath Ceremony Anjali Damania criticizes Bhujbal : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश केला जाणार अशी माहिती समोर आली आहे. खुद्द छगन भुजबळ यांनी याबाबत स्पष्टोक्ती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, आज सकाळी दहावाजेनंतर छगन भुजबळ यांचा शपथविधी पार पडणार आहे.
छगन भुजबळ मंत्री होणार या वृत्तानंतर आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून अनेक प्रतिक्रीया येत आहेत. यात काहीजण टीका करत असल्याचेही दिसते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भुजबळांना लक्ष्य करत जोरदार टीका केली. आता या टिकेची जास्त चर्चा होत आहे.

"..म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जाणार? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकडं करू शकत नाही ? हा काय नाईलाज आहे, सभ्य माणसं भेटत नाहीत का?" असा सवालही अंजली दमानिया यांनी केला.
छगन भुजबळ मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार ?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 20, 2025
वाह फडणवीस वाह !
म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जमणा? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही ?
असा… pic.twitter.com/dLj7MN79JE
नेमकं काय म्हणाल्या अंजली दमानिया?
धनंजय मुंडे गेल्यानंतर परत सरकार आपल्यावर छगन भुजबळांना आपल्यावर का थोपवत आहे. जर त्यांना पुन्हा थोपवले तर का असा त्रास जनतेला देत आहात हे मी सरकारला विचारेल.मी समजेल की हा आमच्यासाठी संदेश आहे की, तुम्ही आमचे काहीच करु शकत नाही.
मी माझा लढा सुरु ठेवू की बंद करु?
अंजली दमानिया म्हणाल्या, छगन भुजबळांना मंत्रिपद देणं, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करणं म्हणजे मला खरंच प्रश्न पडला की, आता मी माझा लढा बंद करु की सुरुच ठेवू, असा प्रतिसवालही त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत व्यक्त केला.
काय आहे अंजली दमानिया यांची पोस्ट?
छगन भुजबळ मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार ?...
वाह फडणवीस वाह !
म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जाणार? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकडं करू शकत नाही ?
असा काय नाईलाज आहे ? की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात ?
आणि हो, हेच भुजबळ जेव्हा जेल मध्ये होते, तेव्हा एक अगदी बिचाऱ्या सारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा. तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत ? किळस वाटतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची खालच्या घोषणा आठवतात?
"भ्रष्टाचारीयो पर कारवाई के लिए, अब की बार 400 पार"
"भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम"
हा आहे का तो बडा कदम ? ही ती कारवाई ?
मंत्रिपदाबाबत काय म्हणाले भुजबळ
"मला सांगण्यात आलं की, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात माझा समावेश होईल. मंगळवारी सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा होईल." असे वक्तव्य छगन भुजबळ म्हणाले आहेत.












Click it and Unblock the Notifications