दोन सख्ख्या, दोन चुलत भावांसह पाच युवकांचा तलावात बुडून मृत्यू; महाराष्ट्रातील या गावात पसरली शोककळा
चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात बुडून 5 युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. उन्हाळ्याचा पारा चढत असल्याने घोडाझरी तलावात दुपारच्या वेळी आंघोळ करायला गेलेल्या तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तलाव पात्रात बुडालेल्या तरुणांना पाण्यातून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

पोहोयला गेले अन्...
तलावात पोहायला गेलेले पाचही युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे रहिवासी होते. एकाच गावातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गावांवर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तलाव पात्रात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे आणि तेजस ठाकरे अशी आहेत.
मृतांत एकाच घरातील चारजण
बुडालेल्या पाच जणांमध्ये दोन सख्खे भाऊ आहेत. दोन चुलत भाऊ आहेत. हे चार जण जण गावंडे कुटुंबातील आहेत. तर एका मित्राच्या समावेश आहे. या घटनेनंतर गावंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. हे युवक पर्यटनासाठी येथे आले असल्याचे समजते. दुपारी ऊन जास्त असल्याने हे युवक तलावात पोहण्यासाठी उतरले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पर्यंटकांची असते गर्दी
घोडाझरी तलाव हा घोडाझरी धरणाचा एक भाग आहे. घोडाझरी वन्यजीव अभयारण्यासाठी देखील ओळखले जाते. यामुळे घोडाझरी तलाव हे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यामुळे साठगाव कोलारीमधील युवकही पर्यटनासाठी आले असण्याची शक्यता आहे. घोडाझरी तलाव हे पक्षांसाठी महत्वाचे ठिकाणी आहे. या ठिकाणी स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी येतात. पक्षांना अखंड पाण्याचे स्रोत आणि भरपूर अन्न या तलावात मिळते. त्यामुळे पक्षी प्रेमी तलाव परिसरात येत असतात.












Click it and Unblock the Notifications