एकनाथ शिंदेंचा चिमटा अन् अजितदादांच्या गुदगुल्या; महायुतीच्या पत्रकार परिषद गाजली...
महाराष्ट्राचे अर्थसंकल्पिय अधिवेशन उद्या म्हणजेच ३ मार्चपासून सुरू होत आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. तत्पूर्वी विरोधकांना चहापानाला आमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यांनी त्यावर बहिष्कार घातला. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमधील हास्यविनोद व चिमट्यांनी गाजली.

अजितदादांचा चिमटा गाजला
पत्रकार परिषदेदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनोदाने सांगितले की, देवेंद्र फडणवीस आणि मी पदांची (मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद) अदलाबदल केली आहे. अजित पवार यांचे पद (उपमुख्यमंत्री पद) निश्चित आहे. एकनाथ शिंदे यांच्या या मिश्लिलीवर उपस्थितांमध्ये हशा पिकला. तेव्हा अजित पवार म्हणाले की, जर तुम्ही तुमची खुर्ची स्थिर ठेवू शकत नसाल तर मी काय करू. अजितदादांच्या या हजरजबाबीपणालाही चांगलीच दाद मिळाली. त्यानंतर शिंदे यांनीही तत्काळ उत्तर देत म्हटले की, आम्ही परस्पर संमतीने खुर्ची बदलली आहे.
शितयुद्ध नसल्याचा खुलासा
फडणवीस व शिंदे यांच्यात अजूनही शितयुद्ध सुरु असल्याच्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहेत. शिंदे नाराज असल्याच्या बातम्या वारंवार येत असतात. त्याच मुद्याला शिंदे यांनी हात घातला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांमध्ये आणि माझ्यामध्ये कोणतेही शीतयुद्ध नाही. या उन्हात सर्व काही ठीक आहे. तुम्ही कितीही ब्रेक लावला तरी आमच्यात ब्रेक होणार नाही.
तेच तेच रडगाणं..
चहापानावर कायम बहिष्कार टाकला जात आहे. विरोधकांच्या सर्व आरोपांवर सरकार उत्तर देण्यास समर्थ आहे. सूड भावनेतून तर टॉलरेट केले तर त्याच पद्धतीने उत्तर दिले जाई. तेच तेच रड गाणं गाण्यापेक्षा, आमच्या सोबत यावं विकासाचं गाणं गावं. विरोधक आणि सत्ताधारी अशी रथाचे दोन चाक आहे. ईव्हीएम आणि निवडूक आयोग आणि सुप्रिम कोर्टात न ऐकल्याने आम्ही जनतेत जाऊ असे विरोधक म्हणाले. जनतेच्या दरबारात आम्ही गेलो आणि खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी जनतेने दाखविली असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
थंडा कूल कूल आहे
ज्यांच्यावर लोकांचा विश्वास नाही, त्यांच्या बातम्या तुम्ही कशा छापता. तुम्ही किती ब्रेकींग बातम्या दिल्यातर आमच्यात ब्रेकींग होणार नाही. म्हणे कोल्ड वॉर सुरु आहे. कसलं कोल्ड वॉर, सगळं कसं थंडा कूल कूल आहे. महाविकास आघाडी महायुतीत हाच एक मोठा फरक आहे. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही. जनतेच्यासाठी विकासासाठी आम्ही एकत्र आहोत. हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. आम्हाला ऋृणातून उतराई व्हायचं आहे असेही एकनाथ शिंदे म्हणाले. विरोधकांची संख्या कमी कमी होत चालली आहे. आता कुठपर्यंत आलीय ते पाहावं आणि त्यांनी आता आत्मचिंतन आणि आत्मपरिक्षण करावे असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.












Click it and Unblock the Notifications