अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले- एक स्वप्नवत आणि उत्तम अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थसंकल्पाचे सादरीकरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. यात त्यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक स्वप्नवत अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी कौतुक त्यांनी केले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक उत्तम अर्थसंकल्प सादर केला आहे. हा एक स्वप्नवत अर्थसंकल्प म्हणता येईल, विशेषतः मध्यमवर्गासाठी. त्यांनी असा अर्थसंकल्प सादर केला, म्हणून मी त्यांचे अभिनंदन करतो. आयकर सूट स्लॅबमध्ये बदल करण्यात आला आहे आणि आयकर सूट 12 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही घोषणा भारताच्या अर्थव्यवस्थेत एक मैलाचा दगड ठरेल.

यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांच्या हातात खर्च करण्यायोग्य उत्पन्न येईल, खरेदी होईल, मागणी वाढेल आणि एमएसएमईला फायदा होईल, रोजगार निर्माण होईल. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम दिसून येईल. कृषी क्षेत्रात अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत... आज अनेक योजना जाहीर करण्यात आल्या. मला वाटते की हा एकवीसाव्या शतकात एक पथदर्शी अर्थसंकल्प आहे. हा एक नवीन मार्ग दाखवणारा अर्थसंकल्प आहे.












Click it and Unblock the Notifications