maharashtra budget 2025 : 20 लाख कोटी गुंतवणूक आणि 50 लाख रोजगार; दादांचं टार्गेट
महाराष्ट्राचा २०२५- २६ या वर्षाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मांडला. आपल्या भाषणात अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश दाखवले. त्यासाठी लाडक्या बहिणींचा आभार मानले. अजित पवार म्हणाले, लाडक्या बहिणी मिळाल्या अन् आम्ही धन्य झालो, बारा कोटी प्रियजणांना मान्य झालो. विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो... पुन्हा आलो... असं म्हणत अजितदादांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.

मुख्यमंत्र्यांचे सांगितले स्वप्न
अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले, २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र व्हावे, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. महाराष्ट्र आता थांबणार नाही. आपण थांबायचेच नाही, असा संकल्प मुख्यमंत्र्यांनी केला आहे. विकसित भारत तयार करण्यासाठी आम्ही राज्यातील शाश्वत कामे हाती घेतली आहे. आम्ही कृषी आणि सामाजिक क्षेत्रासाठी काम करणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही अजितदादांनी स्पष्ट केले.
१०० दिवसांचा कृती कार्यक्रम
अजित पवार यांनी राज्यात होणारी गुंतवणुकीचा आढावा अर्थसंकल्पीय भाषणात घेतला. ते म्हणाले, शासनाने पायाभूत सुविधांवर केलेल्या गुंतवणुकीमुळे देशी आणि परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. त्यात वाढ होत आहे. या गुंतवणुकीमुळेच रोजगार वाढत आहेत. येत्या काळात १५ लाख ६५४ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. १६ लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे. आपण १०० दिवसांचा सात कलमी कृती आराखडा तयार केला आहे. या कार्यक्रमामुळे प्रशासन पारदर्शी होणार आहे.
५० लाख रोजगाराचे लक्ष्य
अजित पवार म्हणाले, औद्योगिक धोरण २०२५ आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत. त्यानुसार २० लाख कोटी गुंतवणूक आणि ५० लाख रोजगाराच्या निर्मितीचे लक्ष असणार आहे. केंद्राने आयकरात सूट देत मध्यमवर्गीयांना दिलासा दिला, त्याचा उल्लेख करत अजित पवार म्हणाले की, राज्यातील पायाभूत सुविधा व प्रकल्पांना भरीव तरतूद केली. विकसित राष्ट्र संकल्प सिद्धिस नेण्यासाठी महाराष्ट्र आता थांबणार नाही, असा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.












Click it and Unblock the Notifications