BMC Election 2026: मतदानाला तांत्रिक बिघाडांचे ग्रहण; EVM व मतदार याद्यांच्या घोळामुळे सर्वत्र गोंधळ
BMC Election 2026 : महाराष्ट्र विधानसभेच्या रणधुमाळीनंतर आता सर्वांचे लक्ष लागलेल्या बीएमसीसह राज्यातील महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकांसाठी आज, गुरुवार १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
मात्र, या 'हाय-प्रोफाइल' निवडणुकीत सकाळपासूनच तांत्रिक बिघाडांच्या बातम्यांनी खळबळ उडवून दिली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नवी मुंबईसारख्या महत्त्वाच्या भागात ईव्हीएममधील बिघाड आणि मतदार याद्यांमधील गोंधळामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

ईव्हीएममधील बिघाड आणि रोहित पवारांचे गंभीर आरोप
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे मतदारांना तासनतास रांगेत उभे राहावे लागले. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
आमदार रोहित पवार यांनी पीटीआयशी बोलताना अत्यंत गंभीर दावे केले आहेत. ते म्हणाले, अनेक मतदान केंद्रांवरील ईव्हीएममध्ये वेळेचा १५ मिनिटांचा फरक दिसून येत आहे. काही ठिकाणी चौथे बटण दाबल्यावर बीपचा आवाज येतो, परंतु लाईट लागत नाही. यामुळे मत नक्की नोंदवले गेले की नाही, याबाबत मतदारांमध्ये संभ्रम आहे. मशीनमधील या तांत्रिक त्रुटींमुळे मतदानाची गती मंदावली असून, पक्ष नेतृत्व आणि स्थानिक प्रतिनिधींनी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
रोहित पवार यांच्या मते, अशा प्रकारच्या त्रुटींमुळे निवडणुकीच्या विश्वासार्हतेवर परिणाम होत असून मतदारांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण होत आहे.
मंत्र्यांचेच नाव गायब! गणेश नाईक यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
केवळ ईव्हीएमच नव्हे, तर मतदार याद्यांमधील गोंधळाचा फटका चक्क सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनाही बसला आहे. नवी मुंबईत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांना मतदानासाठी मोठी कसरत करावी लागली.
गणेश नाईक यांनी माध्यमांकडे आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, नाईक कुटुंबीय वर्षानुवर्षे ज्या शाळा क्रमांक ९४ मध्ये मतदान करतात, तेथे त्यांचे नाव यादीत आढळले नाही. त्यांना दुसऱ्या केंद्रावर जाण्यास सांगण्यात आले. एकाच इमारतीत राहणाऱ्या एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे तीन वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर विभागली गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
प्रशासकीय निष्काळजीपणा
"जर माझ्यासारख्या मंत्र्याचे नाव मतदार यादीत गोंधळात पडू शकते, तर सामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील?" असा थेट सवाल नाईक यांनी उपस्थित करत राज्य निवडणूक आयोगाला या गोंधळासाठी जबाबदार धरले.
निवडणूक आयोगासमोर मोठे आव्हान
राज्यातील अनेक शहरांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू असताना समोर आलेल्या या तक्रारींमुळे निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. ईव्हीएममधील तांत्रिक बिघाड आणि मतदार याद्यांमधील नावांची अदलाबदल यामुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उद्या मतमोजणी
मतमोजणी निवडणूक आयोगाकडून या तांत्रिक तक्रारींवर अद्याप अधिकृत आणि सविस्तर स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, १६ जानेवारी रोजी होणारी मतमोजणी अत्यंत चुरशीची आणि महत्त्वाची ठरणार आहे.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
Bihar next cm : ठरलं! 'हा' नेता होणार बिहारचा नवा मुख्यमंत्री! नितीश कुमार दिल्लीला जाणार.. -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
'धुरंधर-2' चा राडा! पहिल्याच दिवशी 'एवढी' कमाई; 'रणवीर'च्या चित्रपटाचे रेकॉर्डब्रेक ॲडव्हान्स बुकींग -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका!










Click it and Unblock the Notifications