फक्त तरुण आमदारच होणार मंत्री..? भाजपच्या फाँर्म्यूल्यामुळे ज्येष्ठ आमदारांचे टेन्शन वाढले
BJP's strategy- महाराष्ट्रात नुकच्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार पुनरागम करत एकहाती सत्ता मिळवली. आज सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक घेणार आहेत. आजच मुख्यमंत्री पदाचे नाव फायनल होऊन मंत्रीपदाचा फाँर्म्यूलाही ठरणार आहे. मात्र भाजपने तरुण आमदारांनाच मंत्री करणार असल्याचा नवा फाँर्म्यूला तयार केल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे ज्येष्ठ आमदारांचे टेन्शन वाढले आहे.

काय आहे भाजपची रणनिती?
आज अमित शहा हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा व मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित करतील अशी चर्चा आहे. मंत्रीमंडळात भाजपचे २० मंत्री असतील अशीही चर्चा आहे. मात्र या नवीन मंत्रिमंडळात भारतीय जनता पक्ष व महायुतीतील सहभागी पक्षही युवा आमदारांनाच संधी देतील, असेही बोलले जात आहे. त्यामुळे ज्येष्ठ आमदार आणि शिंदे सरकारमधील काही जणांना डच्चू मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे. भाजपची भविष्यातील रणनीती म्हणून 50 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
'पार्टी विद डिफरेंस'वर भर
भाजपकडून 'पार्टी विद डिफरेंस'चा दावा केला जातो. लोकसभा निवडणुकीतही भाजपने अनेक कठोर निर्णय घेतले होते. त्यामुळे त्या निवडणुकीत अनेक नवीन चेहरे दिसले. आता राज्य पातळीवर नवीन नेतृत्व तयार करण्यासाठी भाजपची रणनिती सुरु आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील नवीन मंत्रिमंडळात भाजप जास्तीत जास्त युवा आमदारांना संधी देणार आहे. त्यात 50 वर्षांपेक्षा कमी वय हा निकष लावण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक जेष्ठ सदस्यांना मार्गदर्शकांची भूमिकेत जावे लागणार आहे.
या आमदारांना बसू शकतो फटका
महायुतीत सध्या अनेक ज्येष्ठ नेते हे मंत्री आहेत. परंतु भाजपने तरुणांना संधी देण्याचे ठरवल्यास 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना आमदारांना त्याचा फटका बसू शकतो. भाजप यापूर्वी मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणामधील मंत्रिमंडळात धक्कादायक तंत्राचा अवलंबन केला होता. आता तोच फाँर्म्यूला महाराष्ट्रातही दिसे, असे बोलले जात आहे. असे झाले तर चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील आदींना थांबावे लागण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications