शरद पवार हे दंगली घडवायच्या भाषा करतायत,ते त्यांना करु नये- चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : राज्यात वेगवेगळी आंदोलनं तयार करून समाजा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा. शरद पवार यांनी दंगली घडवण्याची भाषा का केली? त्यांच्या मनात काय आहे ते मला माहिती नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, काही लोकं समाज-समाजमध्ये तेढ निर्माण करणे आणि राज्याला विचलित ठेवण्याचं काम करत आहेत असं म्हटलं आहे.

Chandrashekhar Bawankule

राज्यातील जनता ही दंगली पर्यंत जाईल अशी स्थिती नाही,महाराष्ट्र जळण्याचा आणि पेटवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत. राज्यात अशी परिस्थिती कधी नव्हती आणि होणार ही नाही. पण काही लोक समाजात तेढ निर्माण करणे, अशी काही आंदोलनं निर्माण करत आहेत, ज्यामधून तेढ निर्माण होईल असं काम करत आहेत. शरद पवार यांनी दंगली घडवण्याच्या भाषा किंवा दंगली घडतील अशा भाषा, पुढच्या काळात दंगली घडतील अशा भाषा हे कुठल्या कारणावरुन केले आणि त्यांच्या मनात काय आहे हे मला माहीत नाही असं बावनकुळे म्हणाले आहेत.

चंद्रशेखर बावनकुळेचा कॉंग्रेसवर आरोप

मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला काँग्रेसचे नेते गेले नाहीत. ते बाहेर बोलून या मुद्द्यावरुन राजकारण करत आहे. कॉंग्रेस पार्टीची भूमिका कधी ही सामाजिक आरक्षण योग्य पध्दतीने हाताळवं अशी भूमिका नव्हतीचं. वेगवेगळ्या पध्दतीने काँग्रेसने समाजात तेढ निर्माण करून निर्माण करून समाज समाजमध्ये वाद लावण्याचं काम केलं आहे असा आरोपही बावनकुळे यांनी केला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+