बजेटमध्ये महाराष्ट्राला काय? 'ऐका या शालेय मुलीकडून, ठाकरे, पटोले क्लास कधी लावणार?' - भाजपचा पलटवार
मुंबई - अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय? असा सवाल ज्यांना त्यांना पडला आहे. यावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजप-राष्ट्रवादी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या सरकारला सवाल केले आणि आसूडही ओढला. यानंतर भाजपने पलटवार केला असून त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये आंध्रप्रदेश आणि बिहारला विशेष निधी दिला. पण महाराष्ट्राला काहीच दिले नाही, महाराष्ट्राच्या तोंडाची पाने पुसली असा आरोप विरोधीपक्ष करीत आहे.

राज्यात तर सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकाही विरोधकांनी केली. याला भाजपने त्यांच्या @BJP4Maharashtra या पेजवर पोस्ट करुन प्रत्युत्तरही दिले आहे.
काय आहे पोस्ट?
भाजपने जी पोस्ट केली, त्यात "अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले? ऐका प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या या चिमुकलीकडून... उद्धव ठाकरे, रोहित पवार, नाना पटोले यांनी या चिमुकलीकडे कधी क्लास लावताय? तुम्ही कितीही खोटा प्रचार केलात तरी सत्य हे बाहेर येतेच." असे म्हटले आहे.
‘अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले? ऐका प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या या चिमुकलीकडून…
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) July 24, 2024
उद्धव ठाकरे, रोहित पवार, नाना पटोले यांनी या चिमुकलीकडे कधी क्लास लावताय? तुम्ही कितीही खोटा प्रचार केलात तरी सत्य हे बाहेर येतेच...
लहान मुलीला कळलं पण, महाराष्ट्रातील अति शहाण्या… pic.twitter.com/CKNoXwQznS
"बुद्धीविकत घेता येत नाही.."
"लहान मुलीला कळलं पण, महाराष्ट्रातील अति शहाण्या विरोधकांना कळलं नाही. विरोधकांनो तुमचं दुर्दैव असं आहे की, बुद्धी विकत घेता येत नाही, आणि ज्याची तुम्हाला नितांत गरज आहे." असेही या पोस्टमध्ये मजकूर लिहीत विरोधकांना उत्तर दिले आहे.
फडणवीसांचे 'ते' उत्तर
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अजेंड्यावर महाराष्ट्र आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ज्या ज्या मागण्या केंद्राकडे केल्या आहेत, त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत, याची खात्री आहे. अद्याप अर्थसंकल्पाची प्रिंट मिळाली नाही. तरीही अर्थसंकल्प ऐकत असताना जे महाराष्ट्राला मिळाले अंतिम प्रिंट आल्यानंतर महाराष्ट्राच्या वाट्याला नेमके काय आले? हे सांगतो असे म्हणत
फडणवीस यांनी यादीच वाचली.
महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून हे मिळाले
- विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प: 600 कोटी
- महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार: 400 कोटी
- सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर: 466 कोटी
- पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प: 598 कोटी
- महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प: 150 कोटी
- MUTP-3 : 908 कोटी
- मुंबई मेट्रो: 1087 कोटी
- दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर: 499 कोटी
- MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी: 150 कोटी
- नागपूर मेट्रो: 683 कोटी
- नाग नदी पुनरुज्जीवन: 500 कोटी
- पुणे मेट्रो: 814 कोटी
- मुळा मुठा नदी संवर्धन: 690 कोटी












Click it and Unblock the Notifications