भाजपाला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसच्या शरद पवार गटात आज (ता.२५ जून) प्रवेश केला आहे. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

सुर्यकांता पाटील यांच्या प्रवेशामुळे नांदेड जिल्हयात भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. पक्ष प्रवेश झाल्यानंतर बोलताना सुर्यकांता पाटील थोड्या भावूक झाल्या होत्या.
"माझ्या आयुष्यातील बहूतांश काळ साहेबांसोबत गेला आहे. भविष्यामध्यला लढाईला सिध्द होण्यासाठी मी आपल्यासोबत आलेली आहे. या युध्दाच्या प्रसंगी मी आपल्यासोबत आहे.परतीचे दोर मी स्वत:कापलेले आहेत.मी दहा वर्ष आपल्यापासून दूर होते. मी रागामुळे पक्षातून बाहेर पडले होते. मात्र तिथे जाऊन सुध्दया मी १० वर्षात काही केलं नाही. फक्त घरात बसून होते. कधीही कोणला मत देण्याचं आवाहनही केलं नाही. तुम्ही वाट चुकलेल्या कोकराला पुन्हा जवळ घेतलं आहे. आता साहेब मला आदेश द्या. तुम्ही म्हणाल ते काम करायला मी तयार आहे" असं पाटील म्हणाल्या आहेत.
साहेबांनी उभं केलेलं हे युध्द ते जिंकणार आहेत, हे सांगायला माझ्यासारख्या व्यक्तीची आवश्यकता नाही. साहेब आम्हाला आता जास्त पळवा. आपण चालायला लागले की आमच्या पोटात खड्डे पडतात. कारण हे वय नाही. मात्र ज्या घरातील मुलं आमच्यासारखी पळून जातात, त्या घरातल्या बापाला शेवटपर्यंत कष्ट करावे लागतात. मात्र आता मी पुन्ही तुमच्यासोबत काम करायचं ठरवलं आहे. साहेब तुम्ही जयंतराव सांगतील ते काम मी करेन. माझ्यासाठी कोणतंही काम छोटं किंवा मोठं नाही. मला पुन्हा पक्षात प्रवेश दिल्याबद्दल तुमचे आभार", असं सुर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करताना म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications