Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भाजप नितीश कुमारची पार्टी फोडण्याचे काम करतेय! राजन साळवी शिवसेना सोडणार का? राऊतांनी सर्वच सांगितलं

BJP is breaking Nitish Kumar's party, Sanjay Raut alleges : नितीश कुमार यांचा पक्ष आणि त्यांचे खासदार भाजप फोडत आहेत. भाजप हा नेहमीच मित्रांच्या पाठीत वार करणारा पक्ष आहे. त्यामुळे एनडीएत आगामी काळात खळबळ माजू शकते असे भाकित शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

तर शिवसेना (युबीटी) उपनेते राजन साळवी हे शिवसेना सोडणार का? यावर संजय राऊत यांनी आज थेट वक्तव्य केले आहे.

BJP is breaking Nitish Kumar s party  Sanjay Raut alleges

संजय राऊत म्हणाले, राज्यात घडत असलेल्या घटनांच्या पार्श्वभुमीवर तपासाच्या संदर्भात वक्तव्य करणे, तिथे पत्रकार परिषदेत आणणे आणि तपासात अडथळे आणणे कुणी करायला नको. आम्ही वाट पाहत होतो की, पोलिस काय कारवाई करत आहेत हे आम्ही पाहत होतो. आम्ही राजकारण करायला नाहीतर पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांना सांत्वन करायला जाणार आहोत.

चांगले काम केले तर कौतुक करायला हरकत नाही

संजय राऊत म्हणाले, भविष्यात सत्ता असेलच असे नाही एनडीएच्या कशा चिरफाळ्या उडतील हे तुम्ही पाहावे. सामनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल आलेल्या लिखाणाबद्दल संजय राऊत म्हणाले, मराठानंतर सामना सत्य आणि असत्य काय हे सांगत आहे, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून आम्ही उत्तम काम केले म्हणून सामनातून कौतूक केले. बीड मस्साजोग प्रकरणी आम्ही त्यांच्यावर टीकाही केली त्यामुळे चांगला फायदा झाला आणि तपासाला वेग लागला. मुख्यमंत्र्‍यांनी पक्षविरहीत काम केले तर का कौतुक करायचे नाही. गेल्या काही काळात ते काही लोकांच्या कोंडाळ्यात अडकल होते आणि एककल्ली काम करत होते त्यावेळी आम्ही टीकाही केली होती.

लाडकी बहिण योजना सुरु राहणार नाही...!

लाडक्या बहि‍णींच्या अर्जांची छाननी सुरु आहे, सरकार छाननीनंतर अपात्र बहि‍णींच्या खात्यातील पैसे परत घेणार आहेत या प्रश्नावर राऊत म्हणाले की, लाडक्या बहि‍णींच्या जीवावरच सरकार सत्तेत आले आहे. आता ज्यांचे पैसे ते परत घेणार आहेत त्यांची मतेही परत द्या..हा विषय अत्यंत गंभीर आहे यात फार मोठा घोटाळा झाला असून निवडणुका जिंकण्यासाठी हा प्रकार केला होता. भविष्यात लाडकी बहिण योजना राहील की नाही हा मला प्रश्न वाटतो.

भविष्यात भाजप शिंदे, पवारांसोबत निवडणुका लढणार नाही

संजय राऊत म्हणाले, भाजप भविष्यात महाराष्ट्रात अजित पवार, एकनाथ शिंदेंसोबत एकत्र निवडणुका लढवणार नाही. नितीश कुमारांचे दहा खासदार भाजप फोडत आहेत, त्यामुळे नितीशकुमार अस्वस्थ आहे. ते एनडीएत राहतील की नाही यात मला शंका आहे. जो मित्र असतो त्याच्या पाठीत वार करायचे हे भाजपचे धोरण बिहारमध्येही सुरु झाले आहेत.

राजन साळवींशी चर्चा

संजय राऊत म्हणाले, राजन साळवी आज मातोश्रीवर येणार आहेत. आम्ही तिथे सर्वजण आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राजन साळवी यांच्यात संवाद सुरु आहे. उपनेत्यापर्यंतची सर्व पदे त्यांना दिले आहेत ते कडवट झुंजार शिवसैनिक आहेत. त्यांच्या मनात शिवसेना सोडणे हा विचारही नसेल.

"फडणवीसांच्या सांगण्यावरुन धस बोलत आहेत"

संजय राऊत म्हणाले, बीड प्रकरणात पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा. सुरेश धस यांचे बोलणे हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या सांगण्यावरुन होत आहे असे वाटते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+