मुख्यमंत्रीपद ठरले, महायुतीचे गृहखात्यावरुन घोडे अडले! भाजप-शिवसेनेत कलगीतुरा! वाचा कोण काय म्हणाले?

BJP Eknath Shinde's shivsena Dispute over post of Home Minister : महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे आता स्पष्ट झाले पण गृहखाते कुणाकडे राहणार हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. गृहखाते भाजपकडे कि शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार या प्रश्नावरुन आता कलगीतुरा रंगत आहे.

याच कारणामुळे सत्ता स्थापनेचे घोडे अडल्याची चर्चा सुरु आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी गृहमंत्री पद हवे हे बोलून दाखवले त्यातच आज गृहमंत्रीपदावरुन राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक सूचक विधान केले आहे. त्यामुळे आता गृहमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे अडून बसल्याची चर्चा आहे.

BJP Eknath Shinde s shivsena Dispute over post of Home Minister

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला शिवसेनेने कालच पाठींबा दिला आहे. यापूर्वीही आम्ही हेच सांगितले होते. त्यामुळे तो डेडलाॅक संपला आहे. असे म्हणतानाच आता मुख्यमंत्रीपदाचा सुटला पण गृहखात्याचा डेट'लाॅक' एकनाथ शिंदेंनी केला अशी शक्यता आता व्यक्त होत आहे आणि हाच डेट लाॅक महायुतीत पाहायला मिळत आहे.

गृहमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आरामासाठी आपल्या सातारा येथील दरे गावात गेले होते, दोन दिवस तिथे त्यांनी आराम केला पण या काळात त्यांनी काही व्युव्हरचना तयार केली असेल हे सांगितले जात आहे. सध्या ते चर्चेचीच भाषा करीत असल्याने व्युव्हरचनेसंदर्भातील त्यांची तयारी पुर्वनियोजित होती असे जाणकार सांगत आहेत.

गृहखाते अन् सभापतीपदावर काय म्हणाले एकनाथ शिंदे?

एकनाथ शिंदे यांना गृहखाते आणि सभापदीपदावर प्रश्न विचारल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले होते की, चर्चा होईल आणि त्यातून बऱ्याचशा काही गोष्टी सुटतील सर्वात महत्वाचे म्हणजे आम्हाला ज्यांनी निवडून दिले त्या जनतेचे कल्याण करणे होय. एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदावर तोलून मापून मोजकेच बोलत आहेत त्यावरुन त्यांना हे पद हवे आहे असे दिसते, याला शिवसेनेचे एक एक नेते गृहमंत्रीपद हवे म्हणून उघड मागण्या करत आहेत. संजय शिरसाट असो की, शंभुराजे देसाई अथवा भरत गोगावले यांनी ही मागणी केली होती.

गृहखात्यावरुन काय म्हणाले शिवसेनेचे 3 नेते

संजय शिरसाट यांनी शिवसेनेलाच गृहखाते द्यावे अशी मागणी केली आहे. तर शंभुराज देसाई यांनीही या मागणीला जोरदिला. अंतीम निर्णय हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे चर्चा करुन ठरवतील असे ते म्हणाले. तर भरत गोगावले म्हणाले की, गृहमंत्रालय मागच्यावेळी फडणवीस यांच्याकडे होते तसे आमच्याकडे यावेळी गृहमंत्रीपद द्यावे ही मागणी आहे. यात चुकीचे काय असा सवालही त्यांनी केला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+