भूशी डॅम दुर्घटनेनंतर प्रशासनाने अतिक्रमणांवर फिरवला बुलडोझर
पुणे : लोणावळ्यात एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेल्यानंतर झोपलेल्या प्रशासनाला जाग आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाने पर्यटनस्थळावरील अतिक्रमाण हटवायला सुरुवात केली आहे. भुशी धरण परिसरात पर्यटनाला अडसर ठरणारी छोटे हॉटेल, फेरीवाले, चना-चाट विक्रेत्यांवर कारवाई करत बुलडोझर फिरवला आहे.

लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली आहे.
भविष्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबियांसारखी दुर्घटना घडू नये आणि त्याला ही अतिक्रमणे जबाबदार ठरू नयेत, म्हणून प्रशासनाने तातडीनं हा निर्णय घेतलाय.भुशी धरण परिसरात चहा,नाष्टा,भजी विक्रेते,फेरीवाले,कणीस विक्रेते यांनी दुकाने थाटली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे.
पावसाळ्यात पर्यटकांची होते गर्दी
लोणावळ्यातील पर्यटन स्थळ असलेलं भुशी धरण हे आज ओव्हरफ्लो झालं आहे.पुणे आणि मुंबई यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून पर्यटक हे केवळ भुशी धरणात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात.मात्र या ठिकाणी अतिक्रमणामुळे मोठी गर्दी झाली आहे. दोन दिवसापूर्वी घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली.याची गंभीर दखल घेऊन कारवाईला सुरुवात केली आहे.
या कारवाईवेळी रेल्वे पोलीस दल आणि लोणावळा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.लोणावळ्यातील धबधब्यात एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेल्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट कठोर कारवाईचे आदेश दिले आणी आज प्रशासनाने अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवला आहे.
लोणवळ्यातील प्रसिध्द असलेला लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट आणि शिवलिंग पॉइंट या ठिकाणी संध्याकाळी 6 पर्यंतच पर्यटकांना जाण्यासास परवानगी असणार आहे. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर या पर्यटनस्थळी जाणण्यासा पर्यटकांना बंदी असणार आहे. नियमांचे उल्लघन करणा-यांविरोधात कारवाई देखील केली जाणार आहे. लोणवळ्यातील अनेक धबधब्यांवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.तसेच लोणवळ्यातील महत्वाच्या पर्यटनस्थळी 31 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आल्याची माहिती आहे.












Click it and Unblock the Notifications