हिरव्या सापांची वळवळ खपवून घेणार नाही, नितेश राणेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान...
भाऊचा धक्का परिसरात अनधिकृत बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरीप्रकरणी वाद वाढत असताना, महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट घटनास्थळी भेट देत स्पष्टपणे इशारा दिला - "हे हिंदुस्थानातील अधिकृत बंदर आहे, कराचीचं नाही. इथं बेकायदेशीर घुसखोरांची वळवळ खपवून घेतली जाणार नाही."

मंत्रीपदाची परवा न ठेवता स्पष्ट इशारा
नितेश राणे यांनी सांगितले की, "आमच्या भगिनींवर जे काही घडलं, ते माफ करणं अशक्य आहे. इथून पुढे जर काही अनुचित घडलं, तर आम्ही पोलीसांत तक्रार करणार नाही - थेट कारवाई करू.
"हिंदूंना मुस्लिमांची नाही, हिंदूंना हिंदूंची भीती - सावरकरांचे विचार आठववा"
राणे यांनी आपल्या भाषणात सावरकरांचा दाखला देत सांगितले की, "हिंदूंना मुस्लिमांची नाही, तर हिंदूंचीच भीती आहे, हे सावरकरांनी सांगितलं होतं." त्यांनी पुढे रोषाने म्हटलं, "जे कोणी हिरव्या सापांना मदत करत आहेत, त्यांच्या नावासकट आम्ही पुढील पावलं उचलणार."
"मच्छी व्यवसायावर हिंदूंचाच हक्क"
ते पुढे म्हणाले, "भाऊचा धक्का हा हिंदू मच्छीमारांचा पारंपरिक व्यवसायाचा भाग आहे. इथं कोणत्याही बांगलादेशी वा रोहिंग्याला मच्छी विकण्याची परवानगी नाही. एकही परदेशी घुसखोर याठिकाणी दिसू नये. यापुढे प्रत्येक व्यक्तीची कागदपत्रं तपासली जातील."
"अनधिकृत धार्मिक स्थळं हटवण्यात येतील"
राणे यांनी सांगितले की, "इथं कोणतेही अनधिकृत मदरसे वा मशिदी उभारायचे नाहीत. जर अशा गोष्टी घडल्या तर आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू. आमच्या कोळी बांधवांवर अत्याचार सहन केला जाणार नाही."
सरकारची कटाक्षाने नजर
ही भेट देताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, "हे कराचीचं बंदर नाही - हे आमचं भाऊचा धक्का आहे. प्रत्येक घुसखोरावर लक्ष ठेवले जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल." तसेच त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडून कठोर धोरण राबवले जात असल्याचंही स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications