‘लाडक्या बहिणीं'च्या छोट्या मुलीही असुरक्षित, उद्धव ठाकरे बदलापूर प्रकरणावरून सरकारवर कडाडले
मुंबई : बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर येताच, राज्यात संतापाची लाट उसळली आहे. शहरातील नागरिकांनी मंगळवारी सकाळी शाळेसमोर ठिय्या आंदोलन तसेच रेल्वे रोको करण्यात आंदोलन केले. यानंतर विरोधकाही आता राज्य सरकारवर तुटून पडले आहेत. 'लाडक्या बहिणीं'च्या छोट्या मुलीही असुरक्षित असल्याचा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
संपूर्ण देशात हल्ली अशा घटना वारंवार घडतात पण आपल्याकडे ठराविक राज्यातल्या ठराविक घटनांचं राजकारण केले जाते. एका बाजूला आपण लाडकी बहीण म्हणत असताना योजना आपल्या राज्यात लाडक्या बहिणी आणि या बहिणींच्या लहान मुली असुरक्षित आहेत. त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत.

आपण कुठल्यातरी एखादा विषय घेऊन हे एखाद्या राज्यात झालेली घटना नाही देशात कुठली अशी घटना घडतात कामा नये आणि या घटनेला जे कोणी गुन्हेगार जबाबदार असतील त्यांना तर लवकरात लवकर खटला चालवून शिक्षा व्हायला हवी.काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये निर्भया कांड झालं होतं. निर्भयाचे सगळे आरोपी पकडले आणि गुन्हे उघड झाले पण किती वर्षांनी त्यांना फाशी दिले गेले आणि मग या सगळ्या दिरंगाईला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी ठाकरे यांनी उपस्थित केला.
आरोपीला निंबध लिहून घेऊन सोडणार का?
ती शाळा भाजपसंबंधीत आहे. मला राजकारण करायचे नाही. मी यामध्ये राजकारण नाही आणत, पण इतर ठिकाणी कोणी राजकारण करु नये, तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असला, तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असला तरी विनाविलंब कारवाई झाली पाहिजे. तो जर भाजपा कार्यकर्ता असेल तर त्याच्याकडून निबंध लिहून घेऊन सोडून देणार आहात का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
शक्ती विधेयक का रखवडले?
उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही आमच्या काळात शक्ती विधेयक आणणार होतो पण विधानसभेचे अधिवेशन दोन ते तीन दिवसांचे झाले, त्यामुळे हे विधेयक रखडले नंतर गद्दारी करुन आमचे सरकार पाडले आणि आता त्यांनी हे विधेयक रखडवलेले आहे. हे विधेयक लागू करुन या गुन्हेगारांना शक्ती विधेयकाची खरी शक्ती दाखवून देण्याची जबाबदारी सत्ताधा-याची आहें.












Click it and Unblock the Notifications