Badlapur school girl rape case: फडणवीसांचे SIT चौकशीचे आदेश, म्हणाले - कठोर कारवाईसाठी प्रयत्न करणार
Badlapur school girl rape case : बदलापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत.
बदलापूर येथे एका बड्या शाळेत चिमुकल्या विद्यार्थिनीवर शिपायाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. यानंतर सात दिवसांनी आज जनक्षोभ उसळला आहे. या घटनेनंतर राज्यसरकार गंभीर दखल घेत असून दुसरीकडे बदलापूरमध्ये मोठे जनआंदोलन केले जात आहे.

दोषींवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत.
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत.
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) August 20, 2024
दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी…
दरम्यान बदलापूरमध्ये आंदोलन सुरु असून रेल्वेट्रॅकवर लोक उतरले आहेत. त्यांच्याकडून या घटनेबद्दल संताप व्यक्त होत असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही आंदोलक करत आहेत.
#WATCH | Maharashtra: Protest underway at Badlapur Station against the alleged sexual assault incident with a girl child at a school in Badlapur pic.twitter.com/bKgXAqF44Q
— ANI (@ANI) August 20, 2024
बदलापूर घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी - अंबादास दानवे
एकीकडे राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा उदोउदो करत असताना विद्यार्थ्यांचे मात्र संरक्षण सरकार करू शकत नाही. सरकारची सध्या शो बाजी सुरू आहे. उरण, बेलापूर, मीरा भाईंदरसारख्या घटना ताज्या असतानाच बदलापूर येथील शाळेत अशी घटना घडणे निषेधार्ह आहे. या गुन्हेगारांवर आंध्रप्रदेश राज्यात ज्याप्रमाणे शिक्षा दिली तशी कडक कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
दरम्यान, 15 ऑगस्ट पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना गणवेष वाटप होईल असे शिक्षणमंत्री यांनी सभागृहात दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना जुने गणवेष घालून ध्वजारोहण करावे लागल्याचा आरोपही दानवे यांनी केला. आतापर्यंत केवळ साडेसात लाख विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झाले असून अजूनही 37 लाख विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. गणवेशात कॉटनचे प्रमाण आवश्यक असताना पॉलिस्टर कापडाचा वापर करण्यात आला आहे. तर, शर्टाच्या बाह्यांसाठीही वेगळे कापड लावल्याचे सांगत दानवे यांनी थेट शालेत गणवेष दाखवून यात घोटाळा असल्याचा आरोप केला. तसेच संबंधित अधिकारी, पुरवठादारांवर कारवाईची मागणी केली.












Click it and Unblock the Notifications