मुलाच्या दफनविधीस विरोध, अक्षयच्या पालकांची कोर्टात धाव; म्हणाले- दफनभूमी ही कोणाच्याही मालकीची नाही
Badlapur Case Akshay Shinde Encounter : बदलापूरातील शाळकरी मुलांवर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केला. त्यानंतर त्याच्या दफनविधीवरुन आता वाद निर्माण झालेला आहे. अंबरनाथमध्ये हिंदू स्मशानभूमीत अक्षयचा दफनविधी करण्यास परवानगी न दिल्याने त्याचे आई वडील आता संतप्त झाले आहेत. स्मशानभूमि ही कोणाच्याही मालकीची नाही, ती शासनाची जागा असते, असा सवाल करत त्यांनी आता कोर्टात धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत अक्षय शिंदे याचे आई वडील व नातेवाईक अंबरनाथमधील हिंदू स्मशानभूमी येथे दफन विधीची जागा पाहण्यासाठी आले होते. मात्र, अंबरनाथ पालिकेने दफनविधीच्या परवानगीसाठीची त्यांचा अर्ज स्वीकारला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अंबरनाथमध्ये अक्षय शिंदे याच्या मृतदेह याठिकाणी दफन करण्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे अक्षय शिंदेचा मृतदेह तसाच पडून आहे. त्यामुळे आता अक्षय शिंदे याच्या पालकांनी मुलाचा मृतदेह दफन करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
शिंदेच्या वकील काय म्हणाले?
मृत अक्षय शिंदे याच्या संदर्भात लढणारे याचिकाकर्ते वकील अमित कटारनवरे म्हणाले की, अक्षयच्या मृतदेहाची अवहेलना होत आहे. मृतदेहची विल्हेवाट लावण्यासाठी कायदा आहे. त्या कायद्यानुसार उच्च न्यायालयामध्ये मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही धाव घेणार आहोत.त्यानंतरच मृतदेहाची विल्हेवाट कशी करायची, याबाबतीत कोर्टाकडूनच आम्ही परवानगी घेणार आहोत.
सरकारी जमीन कुठल्याही जातीधर्माची नसते
दफनभूमी ही शासनाची आहे कोणाच्याही मालकीची नाही. त्यामुळे मृतदेह दफन करण्यासाठी अंबरनाथ येथे जागा देण्यास का नकार दिला, याबाबतीत कटारनवरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारी जमीन ही कुठल्याही जातीधर्माची नसून त्या जागेवर अंत्यविधी नाकारणारे लिंगायत समाज आणि गोसावी समाज यांचा दफनभूमीवर मालकी हक्क आहे का, असा सवाल देखील अक्षय शिंदे याचे वडील अण्णा शिंदे यांनी व त्यांच्या वकीलांनी उपस्थित केला.












Click it and Unblock the Notifications