Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कर्जमाफीवरुन बच्चू कडूंचा एल्गार, CM टू DCMला घाम फोडणार; जाणून घ्या- राज्यभर कसं रानं पेटवणार!,

Bacchu Kadu Latest News : महायुती सरकारने शेतकऱ्यांसोबत बतावणी केली, त्यांचा विश्वासघात केला, असा आरोप करून प्रहार संघटनेचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी आता कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन एल्गार पुकारला आहे. राज्यभर ते आंदोलन करणार आहे. बच्चू कडू यांनी अकोल्यात आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुढील महिन्यापासून आंदोलन करण्यासाठी त्यांनी निर्णय घेतला आहे. बच्चू कडू यांनी 'डीसीएम टू सीएम' अशा आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनांतर्गत बच्चू कडू 2 जूनला बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर 'अर्थसंकल्प वाचन आंदोलन' करत त्यांना कर्जमाफीची आठवण करुन देणार आहेत. बारामतीत सुरु करणाऱ्या आंदोलनाचा शेवट नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करुन केला जाणार असल्याची माहिती कडू यांनी दिली.

Bacchu Kadu

7 जुलैपासून मोझरीत आमरण उपोषण

अजित पवारांच्या घरासमोरील आंदोलनानंतर बच्चू कडू पुढे टप्प्याटप्याने पंकजा मुंडे, बाळासाहेब पाटील आणि संजय राठोड यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत. यात सर्वात शेवटी कर्जमाफीच्या मुद्द्यावर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलनाची घोषणा त्यांनी केली आहे. दरम्यान, कर्जमाफीच्या मुद्द्यावर 7 जुलैपासून तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकूंज मोझरी किंवा आपलं जन्मगावं असलेल्या कुरळपूर्णा येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यानी दिला.

अजित पवारांवरही जोरदार टीका

दरम्यान, अजित पवारांनी कर्जमाफीचे आश्वासन आपण दिले नसल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीचा राजकीय बाप असलेल्या भाजपचं कर्जमाफीचं वचन पूर्ण करणं ही अजित पवारांची जबाबदारी असल्याचं ते म्हणालेत. शेवटी बापानं दिलेलं वचन मुलालाच पुर्ण करावं लागतं असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावलाय.

100 दिवस झाले तरीही कर्जमाफी नाही

सरकारला 100 दिवस उलटून देखील शेतकरी कर्जमाफी बाबतीत सरकार निर्णय घेत नसल्याने प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पैसे भरावे असं वक्तव्यही केलं होतं. यावरुन बच्चू कडू आता आक्रमक झाले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+