95 व्या वर्षी EVM आणि निवडणूक प्रक्रियेसंदर्भात आंदोलन करणारे बाबा आढाव कोण? वाचा त्यांची जीवनगाथा
Baba Aadhav protested against EVM : निवडणूक प्रक्रियेबाबत राज्यासह देशातील नागरिकांकडून शंका व्यक्त होत आहेत, यामुळे नागरिकांचा आवाज म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन पुण्यात सुरु केले आहे.
निवडणूक प्रक्रियेबद्दल नागरिकांना शंका असेल तर त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार ती पाळत नसेल तर आंदोलन करु असे म्हणत त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. ते कोण आहेत त्यांचे जीवनचरित्र्य काय आहे त्यांचा राजकीय प्रवास आणि सामाजिक कार्य तसेच साहित्यसंपदा आणि आंदोलने आदीचा धांडोळा आपण घेऊया.

बाबासाहेब पांडुरंग आढाव पुण्याचे निवासी असलेले बाबा आढाव हे असंघटित कष्टकऱ्यांचे नेते म्हणून परिचित आहेत. ते सत्यशोधक चळवळीचे किंवा विचारांचे नेते समजले जातात. बाबा आढाव हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.
पुण्यात शिक्षण, समाजाचा डाॅक्टर
डॉ. बाबा आढाव यांचा जन्म 1 जून 1930 रोजी पुण्यात झाला. प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. बीएस्सीची पदवी मिळाल्यानंतर मिश्र वैद्यकशास्त्राची डीएएसएफ पदविका प्राप्त केली. प्रारंभी काही वर्षे त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला. "महाराष्ट्र आरोग्य मंडळ' या संस्थेची स्थापना करून व्यक्तिगत वैद्यकीय व्यवसायाचे "सामाजीकरण' केले. त्याचेच रूपांतर साने गुरुजी रुग्णालयात झाले. त्यांनी 1966 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली. व्यक्तिगत रुग्णोपचाराऐवजी समाजाला जडलेल्या विविध व्याधींवर उपचार, शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी स्वतःला पूर्णत्वाने समर्पित केले.
बाबा आढाव यांच्या जीवनातील महत्वाचे टप्पे आंदोलन
आंदोलन
- बाबा आढाव यांची जडणघडण राष्ट्रसेवा दलात झाली. आयुष्यातील पहिला सत्याग्रह त्यांनी 1952 साली अन्नधान्य भाववाढीविरोधात केला.
- गोवा मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात ते अग्रणी होते. आणिबाणीत मोठा मेळावा घेतला. तुरंगवासही त्यासाठी सोसला. शेतकरी पुर्नवसन परिषदेची त्यांनी स्थापना केली.
- प्रकल्प ग्रस्तांना पुनर्वसनाच्या कायदेशीर हक्कांसाठी लढा. हमालांच्या उत्थानासाठी कार्य केले.
सामाजिक कार्य, राजकारण
- 1955 ते 1972 या कालखंडात प्रजासमाजवादी संयुक्त समाजवादी पक्षातर्फे एस एम जोशी, नानासाहेब गोरे, भाई वैद्य यांच्यासोबत चळवळी आंदोलने केली. दोन वेळा नगरसेवक झाले. नंतर राजकीय सन्यास घेतला.
- बाबा आढाव यांनी 1974 पासून देवदासी प्रथा निर्मुलन व पुनर्वसनासाठी आंदोलने केली. यामुळे सरकारने देवदासी पुनर्वसन आयोग नेमला. वृद्ध, देवदासींना पेन्शन योजना सुरु झाली.
- गुजरातेतील दंगलग्रस्त, वादळग्रस्त मराठवाड्यातील भूकंपग्रस्तांना भरीव मदत आणि त्यांनी वैद्यकीय सेवा दिली.
- पुण्यात 50 हजार रिक्षाचालकांना संघटीत करुन रिक्षा पंचायत स्थापन केली.
95 वर्षांचे ध्येयवादी 'बाबा' (पुरस्कार)
- बाबा आढाव यांच्या वयाची 95 वर्ष उलटली आहेत.
- पुण्यभूषण पुरस्कार, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, यशवंतराव चव्हाण, कवी कुसुमाग्रज आदी व्यक्तींच्या नावे असलेल्या विविध संस्थांचे पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत.
- मॅन ऑफ दि इयर 2007 पुरस्कार त्यांना प्राप्त आहे.
- 2011 चा उत्कृष्ट समाज कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार मनमोहन सिंग यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.
प्रकाशित साहित्य
एक गाव, एक पाणवठा
सत्यशोधनाची वाटचाल
हमाल पंचायत












Click it and Unblock the Notifications