दहीहंडी, गणेशोत्सवासाठी आशिष शेलार यांचे फडणवीसांना साकडे
Mumabi: दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव ही मुंबईतील सर्वात महत्वाचे सण. लाखों मुंबईकर मोठी उत्साहाने हा उत्सवात सहभाग घेत असतात. या उत्सवात मोठी आर्थिक आणि सामाजिक उलाढाल होत असते. या सणांसाठी मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार मैदानात उतरले असून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.
दहिहंडी उत्सव आणि दहिहंडी साहसी खेळ आणखी मोठ्या स्वरुपात साजरा करण्यात यावा यासाठी "महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन"ची स्थापना करण्यात येत आहे. सदैव खंबीर पाठिंबा देणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकामी मदत करावी, अशी मागणी करीत आशिष शेलार यांच्या नेतृत्वात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने फडणवीस यांची भेट घेतली.

असोसिएशनची स्थापना झाल्यास या खेळाला भव्य स्वरुप प्राप्त होईल, अशी भूमिका समन्वय समितीच्या सदस्यांसह बैठकीत मांडली.
प्लॅस्टर ऑफ पॅरिस मुर्तींवरील बंदीची सरसकट अंमलबजावणी नको
प्लॅस्टर ऑफ पॅरिसने (POP) बनविलेल्या मुर्तींवरील बंदीची महाराष्ट्रात सरसकट अंमलबजावणी होऊ नये. यावर काही तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी शेलार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. राज्यात १२७ वर्षांची जुनी परंपरा असलेला सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव सुरळीत पार पडावा.
यावर रोजगार असलेल्यांचा शासनाने सहानुभूतीने विचार करावा, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. अखिल सार्वजनिक उत्सव समितीच्या (महाराष्ट्र) सदस्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
उत्सव आणि शेलार
सार्वजनिक उत्सव आणि शिवसेना हे मुंबईसाठी अतूट नाते आहे. शहरात कार्यरत असलेल्या बहुसंख्य उत्सव मंडळांवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे वर्चस्व आहे. त्या माध्यमातून शिवसेनेचा लोकसंपर्क आपोआप होत असतो. शिवसेनेचे हे बलस्थान ओळखून भाजपने व्यूहरचना करण्यास सुरुवात केली.
आशिष शेलार यांनी या विषयात विशेष लक्ष घातले आणि अनेक मंडळांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा समावेश करून घेतला. 2017 साली झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आणि भाजपने तब्बल 82 जागा जिंकल्या. त्यानंतर सार्वजनिक उत्सव या विषयांत आशिष शेलार विशेष सक्रिय झाले
शिवसेनेला थेट अंगावर घेणारे नेतृत्व
आशिष शेलार हे शिवसेनेला थेट अंगावर घेणारे मुंबई भाजपमधील नेतृत्व म्हणून ओळखले जाते. शेलार यांच्याकडे मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा आहे. 2014 साली भाजपा आणि शिवसेनेची सत्ता आली तेव्हा शिवसेनेचे नेते भाजपवर टीका करीतच होते त्यांना शेलार यानीच चोख प्रत्युत्तर दिले. 2019 मध्ये शिवसेनेने भाजपशी फारकत घेतली. त्यानंतर सभागृहात आणि सभागृहाबाहेर शिवसेना आणि आशिष शेलार हा सामना चांगलाच रंगला.












Click it and Unblock the Notifications