अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन तरीही ते तुरुंगातच राहणार! पण का? घ्या जाणून
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. हा जामीन सक्तवसुली संचलनालयाच्या प्रकरणात मिळाला आहे, मात्र सीबीआयच्या प्रकरणात ते तुरुंगातच राहणार आहेत. आता मुख्यमंत्रीपदी राहायचे की नाही हे अरविंद केजरीवाल यांनीच ठरवावे असेही न्यायालयाने म्हटले आहे.
अरविंद केजरीवाल ९० दिवस तुरुंगात
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज जामीन मंजूर करताना न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी केजरीवाल यांना 90 दिवस तुरुंगवास भोगावा लागला आहे. त्यांना अंतरिम जामिनावर सोडण्यात यावे, असे निर्देश दिले. तसेच ते निवडून आलेले नेते आहेत हे आम्हाला माहित असल्याचेही ते म्हणाले.

केजरीवाल यांच्यासाठी तीन प्रश्न
अरविंद केजरीवाल यांचे मद्यधोरण घोटाळा प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करीत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. अटकेचे धोरण काय, त्याचा आधार काय. यासाठी तीन प्रश्नही तयार केले आहेत. मोठे खंडपीठ इच्छित असल्यास अंतरिम जामिनावर बदल करू शकते.
केजरीवालांचा मुक्काम कोठडीतच
मनी लाँड्रिंग प्रकरणात केजरीवाल यांना हा जामीन मिळाला असला तरीही ईडीचा तपास सुरुच आहे. तसेच केजरीवाल यांच्या विरोधात सीबीआय दुसऱ्या खटल्यात तपास करीत आहे. इडलीच्या प्रकरणात केजरीवाल यांना जामीन मिळाला असला तरीही सीबीआय प्रकरणामुळे ते सध्या तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाहीत.
सीएमपदी राहणे केजरीवालांचा निर्णय
न्यायालयाने म्हटले- ते निवडून आलेले नेते आहेत. पण निवडून आलेल्या नेत्याला पायउतार होण्यास किंवा मुख्यमंत्रिपदावर राहण्यास आपण पटवून देऊ शकू याबद्दल आम्हाला शंका आहे. हे आम्ही त्यांच्यावर सोडतो. त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री राहायचे की नाही हे त्यांनी ठरवायचे आहे.
केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर राऊज ॲव्हेन्यू कोर्टाने त्यांना कोठडी सुनावली. केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेला आणि कोठडीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर आज सुनावणी झाली.












Click it and Unblock the Notifications