लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढले, शासनाने घेतलाय मोठा निर्णय, 'या' महिलांचे होणार अर्ज बाद
महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेत वेळोवेळी अनक बदल होत आहेत. आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानंतरच अंतिम यादी ठरवावी, असे सांगितले जात आहे. ज्या बहिणींकडे चारचाकी वाहन असेल त्यांची धास्ती वाढली आहे, कारण त्यांचे अर्ज थेट बाद होऊ शकतात.
लाडकी बहीण योजनेचा काय होता निकष?
ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांसाठी महायुती सरकारने 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची' जुलै महिन्यात घोषणा केली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांच्या अकाऊंटमध्ये दर महिन्याल 1500 रुपये जमा होतात. जुलै ते जानेवारी अशा 7 महिन्यांचे एकूण 10 हजार 500 रुपये आत्तापर्यंत कोट्यवधी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास हा हप्ता 2100 करू असं आश्वासनंही महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिलं होतं. त्यामुळे बहिणींना 2100 चा हप्ता कधी मिळणार असा सवालही अनेक बहीणींच्या मनात आहे. त्यावर लवकरच सरकारचा निर्णय अपेक्षित आहे.

आता लाडकी बहीणींची धाकधूक वाढणार
राज्यातील लाडक्या बहिणींची धाकधूक वाढवणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचे निकष वारंवार बदलले जात आहेत. त्यातच आता लाडक्या बहिणींचे टेन्शन आणखी वाढलं आहे. कारण ज्या महिलांकडे किंवा ज्यांच्या घरात चारचाकी वाहन असेल त्यांचे अर्ज थेट बाद होणार असून त्यांचे नाव योजनेतून वगळण्यात येणार आहे. आगामी काही दिवसातच ही पडताळणी केली जाणार आहे.
पुण्यात पडताळणी सुरू होणार, राज्यभरातही हाच पॅटर्न असणार
मिळालेल्या माहितीनुसार, घरात चारचाकी असणे हे लाडक्या बहिणींना महागात पडणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू झाली आहे. तर पुढच्या आठवड्यापासून पुण्यामध्ये ही पडताळणी सुरू होणार आहे. सोमवारपासून पुण्यात लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू होईल. ज्या लाभार्थी महिलांच्या घरात चारचाकी वाहन असल्याचे निष्पन्न होईल, त्या बहिणींची नावे लाडकी बहीण योजनेतून रद्द करण्यात येणार आहेत.












Click it and Unblock the Notifications