ठाकरे पितापुत्रावर खोटे आरोप करायला मी नकार दिल्याने माझ्यामागे इडी, सीबीआय लावली - अनिल देशमुख

मुंबई - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठा गौफ्यस्फोट केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे तीन वर्षांपुर्वी माणूस पाठवला होता, जर मी त्यांना शपथपत्र लिहून दिलं असतं तर उद्धव ठाकरे, अजित पवार, आदित्य ठाकरे हे अडचणीत आले असते असा खुलासा केला आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख?

अनिल देशमुख म्हणाले, तीन वर्षांपुर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे जवळचा माणूस पाठवला. त्यासोबत लिफाफाही माझ्याकडे पाठवला. या चार मुद्द्यांवर शपथपत्र द्या असे त्यांनी म्हटले. मी जर ते करुन दिले असते तर उद्धव ठाकरे, आदीत्य ठाकरे, अजित पवार, अनिल परब अडचणीत आले असते. पण मी शपथपत्र करुन देण्यास नकार दिला त्यामुळे माझ्यामागे इडी, सीबीआय लावली असा त्यांचा दावा आहे.

Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis Maharashtra Politics

खोटे आरोप लावायला सांगितले

अनिल देशमुख म्हणाले, उद्धव ठाकरेंवर खोटा आरोप लावायचे त्यात सांगण्यात आले होते. तसेच आदित्य ठाकरेवरही दिशा सॅलीयनवर रेप करुन तिला बाल्कनीतून ढकलून दिलं असा आरोप लावायचा सांगितला. अजित पवार आणि अनिल परबांवर खोटे आरोप करायला सांगितले होते. मी स्पष्ट नकार दिल्यानेच मला अटक झाली. त्या माणसाला देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलं होतं. माझ्या शासकीय निवासस्थानी त्यावेळी तो माणूस पाठवण्यात आला होता.

जर तुम्ही अजित पवारांवर आरोप करता येत नसेल तर तुम्ही उद्धव ठाकरे आणि आदीत्य ठाकरे यांच्यावर आरोप करा असेही त्यांच्याकडून सांगण्यात आल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.

मी पुराव्याशिवाय बोलत नाही

अनिल देशमुख म्हणाले, माझ्याकडे यासंदर्भात पुरावे आहे, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. शाम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपात तथ्य आहे, मला दोनदा ऑफर देण्यात आली होती.

काय म्हणाले होते श्याम मानव?

"मविआ सरकारमध्ये मुंबई पोलीस आयुक्तांनी हे पत्र दिलं होतं की १०० कोटी रुपये महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गोळा करायला सांगितले. त्यानंतर त्या आधारावर एका नेत्याने अनिल देशमुख यांच्याकडे चार प्रतिज्ञापत्रं पाठवली. त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही या चारही प्रतिज्ञापत्रांवर सही करा, तर तुम्हाला ईडी चौकशीला सामोरं जावं लागणार नाही. तसंच तुरुंगात जावं लागणार नाही."

फडणवीसांना मध्ये कशाला आणताय?

या सर्व आरोपांवर भाजप नेते नितेश राणे म्हणाले, अनिल देशमुखांना सत्यच सांगायला सांगितले होते, त्यात आरोपाचा संबंध काय खरंच आहे, आदित्य ठाकरेवर जे आरोप लावण्यात आले ते खरे आहे. अनिल देशमुख जबाबदार नेते आहेत, त्यांनी खरे सांगण्याची हिंमत ठेवायला हवी. देवेंद्र फडणवीस यांना मध्ये आणण्याची काहीही गरज नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+