राज्यात निवडणुकीत एवढी हिंसा कधी झाली नव्हती! हे फडणवीस गृहमंत्री असल्यावरच घडतेय - संजय राऊत
Anil Deshmukh attack Sanjay Raut's allegations against Devendra Fadnavis: राज्यात निवडणुकीत एवढी हिंसा कधी झाली नव्हती तेवढी आता होत आहे, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्यावरच हे राज्यात पहिल्यांदा घडत आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्या हल्ल्याच्या संदर्भाने केला. ते आज माध्यमांशी वार्तालाप करत होते.
फडणवीस यांच्या नागपुरात राज्याचा माजी गृहमंत्र्याला ठार मारण्याच्या हेतू - राऊत
संजय राऊत म्हणाले, शरद पवारांचे खंदे समर्थक अनिल देशमुख यांच्यावर काल नागपूर अत्यंत निर्घुण हल्ला झाला. त्यांच्या डोक्यावर दगडफेकीत जखमा झाल्या, काल ते अत्यवस्त होते, हा हल्ला करताना भाजप जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते. स्वतः गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात राज्याचा माजी गृहमंत्र्याला ठार मारण्याच्या हेतूने हल्ला होतो..या राज्यातील कायदा सुव्यवस्थेतील निघालेले धिंडवडे आहेत, त्याला जबाबदार मिंधे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.

राज्यात अजुनही गृहमंत्र्यांचा हुकूम चालतो
संजय राऊत म्हणाले, निवडणूक काळात राज्याच्या प्रशासकाची सर्व सूत्र निवडणूक आयोगाकडे असतात, तरीही गृहमंत्र्यांचाच हुकूम चालतो. निवडणूक आयोग त्यांच्याच हातात असतात, त्यांचीच माणसं असतात आणि ते एकमेकांच्या हातात हात घालून काम करतात. माजी गृहमंत्र्यांवर निर्घुन हत्या झाली. कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. आम्हाला निवडणुका होईपर्यंत चिंता वाटते की, आज रात्रीपर्यंत विरोधी पक्षांच्या किती कार्यकर्त्यांना धमक्या येतील आणि किती कार्यकर्त्यांवर हल्ले होतील? किती जणांवर खोटे गुन्हे दाखल होतील याची आम्हाला चिंता आहे.
देशमुखांवर हल्ला, महाराष्ट्रात चिंता
संजय राऊत म्हणाले, मी माझा पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून यासंदर्भात चिंता व्यक्त केली. महाराष्ट्राला धक्का आणि चिंता वाटावी असे हे कृत्य आहे. भाजपवाले म्हणतात हा स्टंट आहे आम्ही नरेंद्र मोदींकडून स्टंट करायला शिकलेलो नाही. नरेंद्र मोदींकडून आम्हाला स्टंटगिरी करण्याची गरज नाही ते कायम करत असतात. देशमुखांचे डोके कसे फुटले हे पाहा. कशाला स्टंटची गरज आहे. देशमुखांचे चिरंजीव काटोलमधून उभे आहेत आणि ते निवडून येत आहेत. सातवेळा देशमुख निवडून आले आहेत, भाजपची ही नौटंकी आहे.
फडणवीस, शहा यांच्या काळात हल्ले होताहेत
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात कधी निवडणुकीत असे वातावरण झालेले नाही. राज्याचे माजी गृहमंत्र्यावर असे हल्ले व्हावेत असे वातावरण कोणत्याही निवडणुकीत झाले नव्हते ते देवेंद्र फडणवीस अमित शहा यांच्या काळात झाले. मणीपूर पेटले, रस्त्यांवर महिलांची धिंड काढून बलात्कार होत आहेत. महाराष्ट्रात माजी मंत्र्यांवर हल्ले होत आहेत, यांच्या हातात काय कायदा सुव्यवस्था सुरक्षित आहे.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी देशमुखांवर जीवघेणा हल्ला
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीला गालबोट लागले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञाताने दगडफेक केली. या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले. काटोल विधानसभा मतदारसंघामधील नरखेडमधील सांगता सभा संपल्यानंतर अनिल देशमुख घरी परतत असताना हा हल्ला झाला. अनिल देशमुखांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नेमका कसा झाला हल्ला
अनिल देशमुखांची गाडी तीनखेडा- भिष्णूर मार्गाने परत येत होती. त्यावेळी काटोल- जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यातील एक दगड थेट गाडीच्या काचेवर लागला. हा दगड मोठा असल्याने गाडीची काच फुटून बारीक-बारीक काचा या अनिल देशमुख यांच्या डोक्यावर-तोंडावर लागल्या. त्यामुळे मोठा रक्तस्त्राव झाला. जमखमी अवस्थेत त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications